Sonali Kulkarni Instagram Post : आपल्या अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने हिंदीसह मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या अभिनयाने चर्चेत असणाऱ्या अश्विनी भावे सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या काही फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच त्यांनी काही दिवसांपूर्वी एक खास व्हिडीओ शेअर केला होता.

अश्विनी भावेंच्या परदेशातील घरात मराठी इंडस्ट्रीमधील अनेक तारेतारकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अश्विनी भावेंनी सर्वांचं अगदी प्रेमाने आदरातिथ्य केलं. याचाच व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांच्या या व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओलं लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला.

अश्विनी भावेंनी केलेल्या या आदरातिथ्याबद्दल अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत आणि या पोस्टमध्ये ती म्हणते, “खुद्द अश्विनी मला म्हणाली होती, ‘तू ये ना…’ याआधी जेव्हा जेव्हा मी गेले होते, तेव्हा आमची चुकामुक झाली होती. पण नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनचा ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव’च्या सांगता समारंभाची पार्टी अश्विनी होस्ट करणार हे कळल्यावर भारी वाटलं.”

पुढे सोनाली म्हणते, “तिथे जाईपर्यंत अंदाज नव्हता – पण एवढंच सांगते. अश्विनी आणि किशोरचं प्रेमळ साम्राज्य बघून मन अभिमानानं भरून आलं आणि दणदणीत मेजवानीनं पोटही गच्च भरलं.. किती गोड कपल आहे. अमेरिकेत इतकी सुंदर, इतकी पॅशनेट बागाईतदार बघायला मिळणं फारच विरळ. तिचं संपूर्ण कुटुंबाबरोबर, ‘नाफा’च्या टीमबरोबर मिळून मिसळून असणं, आमच्याशी एवढ्या जिव्हाळ्यानं वागणं… हे बघताना मी हरखून गेले.”

सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम पोस्ट

सोनालीच्या या पोस्टवर अश्विनी भावेंनीही कमेंट केली आहे. कमेंटमध्ये त्या म्हणतात, “तुझ्याबरोबर आणि तुझ्या मैत्रिणीबरोबर ती संध्याकाळ अनुभवून खूप छान वाटलं. आमच्यासाठी तो एक आनंददायक अनुभव होता.” दरम्यान, अश्विनी भावेंच्या परदेशातील घरी डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, अवधूत गुप्ते, वैदेही परशुरामी, स्वप्नील जोशी आणि गजेंद्र अहिरे हे कलाकार उपस्थित होते.

अश्विनी भावे इन्स्टाग्राम पोस्ट

अश्विनी भावेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी पाहुण्यांना घरासमोरील स्वत: केलेल्या शेतीची सफर घडवून आणली. यानंतर अश्विनी यांनी सर्व पाहुण्यांचं प्रेमाने आदरातिथ्यही केलं. नंतर सर्वांनी अवधुत गुप्तेच्या सांगीतिक मैफिलीचा आनंद घेतला.