प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच ‘श्री शिवराज अष्टका’तील पाचवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुभेदार असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा एक खास व्हिडीओ समोर आला आहे.

सुभेदार या चित्रपटाच्या टीमने नुकतंच ठाण्यातील कोरम मॉलला भेट दिली. यावेळी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. यादरम्यानचे काही व्हिडीओ अभिनेता चिन्मय मांडलेकरने शेअर केले आहेत. यातील एका व्हिडीओत एक लहान मुलगा शिवघोष करताना दिसत आहे.
आणखी वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटाच्या पोस्टरवर झळकला ‘नवे लक्ष्य’ मालिकेतील अभिनेता, सोहम बांदेकर म्हणाला “भावा…”

अभिनेता चिन्मय मांडलेकरने या लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो मुलगा मंचावर उपस्थित असलेल्या कलाकारांसमोर शिवघोष करताना दिसत आहे. “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”, असा शिवघोष तो लहान मुलगा करतो. त्यानंतर तो “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “छत्रपती संभाजी महाराज की जय”, असा जयघोषणाही करताना दिसत आहे.

त्याचा हा शिवघोष ऐकल्यानंतर चिन्मय मांडलेकरने त्याला मिठी मारली. तसेच त्याचे कौतुकही केले. “शिव विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हाच ‘श्री शिवराज अष्टका’चा खरा ध्यास!” असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : “दुर्देवाने मराठी माणसाकडे…”, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचे वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान चिन्मयने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ऐकल्यानंतर अनेकजण अंगावर शहारे आल्याची प्रतिक्रिया कमेंटमध्ये करताना दिसत आहेत.