‘सुभेदार’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. श्री शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट आहे. हा ऐतिहासिक चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. शिवराज अष्टक मालिकेतील सगळ्या चित्रपटांमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चिन्मयच्या लूकसाठी चित्रपटाच्या टीमने कशी मेहनत घेतली याची खास झलक व्हिडीओच्या माध्यामातून पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : रवींद्र महाजनींकडे होतं गोळ्यांनी भरलेलं पिस्तूल; वडिलांच्या सुरक्षेविषयी गश्मीर महाजनीचा खुलासा

‘सुभेदार’ चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकसाठी टीमने कशी मेहनत घेतली याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शिवराज अष्टक मालिकेतील चित्रपटांसाठी प्रत्येक कलाकाराची लूक टेस्ट करण्यात येते आणि प्रत्येक भागात लूकसाठी विशेष मेहनत घेतली जाते याबाबत चिन्मय मांडलेकरने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. मात्र, पहिल्यांदाच भूमिकेच्या तयारीची झलक व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना पाहायला मिळाली.

हेही वाचा : Video: “समोरचा मेला तरी कोणी…”, शरद पोंक्षेंचं वक्तव्य चर्चेत; चाळ संस्कृतीविषयी केलं भाष्य

किरण साबळे या सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्टने चिन्मय मांडलेकरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी तयारी केली होती. या मेकअप आर्टिस्टचे नेटक-यांनी भरभरून कौतुक केले आहे. चिन्मय मांडलेकर महाराजांच्या भूमिकेत असल्यावर कधीच सेल्फी काढत नाही. ही भूमिका साकारताना त्याच्या मनात केवळ ‘कृतज्ञता’ ही एकमेव भावना असल्याचे अभिनेत्याने अनेकदा सांगितले आहे.

हेही वाचा : हार्दिक-अक्षयाची थाटामाटात साजरी झाली पहिली मंगळागौर! फोटो पाहून चाहते म्हणाले, “नजर न लगे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सुभेदार’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने तीन दिवसांत ५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. यामध्ये चिन्मय मांडलकेर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.