मराठी अभिनेता सुबोध भावे हा कायमच चर्चेत असतो. सुबोधने मराठी चित्रपट, मालिका यांमध्ये त्याच्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवला आहे. सध्या तो त्याच्या फुलराणी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सुबोध हा विक्रम ही भूमिका साकरत आहे. नुकतंच सुबोध भावेने अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरबरोबर रोमँटिक भूमिका करण्याबद्दल भाष्य केले आहे.

सुबोध भावेने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर काम करण्यावरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले. त्याबरोबर त्याला प्रियदर्शनी इंदलकरबरोबर रोमँटिक भूमिका करण्याबद्दलही विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्याने स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली.
आणखी वाचा : “मला अभिनय क्षेत्रात कधीच करिअर करायचं नव्हतं”, सुबोध भावेचा मोठा खुलासा, म्हणाला “माझं स्वप्न…”

“माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर काम करण्यावरुन अनेकदा मला ट्रोल केलं जातं. चित्रपटासाठी कास्टिंगही मी करतो, माझ्याबरोबर काम कोणी करायचं हे देखील मी ठरवतो, पात्रही मीच लिहितो, असे त्यांना वाटते. त्यामुळे मला त्यांना सांगायचं की बाळांनो पात्र काय आहे, यावरुन हे सर्व ठरत असते. ‘तुला पाहते रे’ या मालिकेत वयस्कर पात्र असलेला माणूस आणि तरुण मुलगी ही त्या गोष्टीची गरज होती. या चित्रपटात ‘फुलराणी’ला शिकवणारा व्यक्ती हा तिच्या वयाचा नाही. जर तिच्या वयाचा व्यक्ती हवा असता तर त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी घेतलं असतं.

जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती शिकवते तेव्हा ती व्यक्ती समजुतदार, अनुभवी असावी लागते. हे सर्व तुमच्या चेहऱ्यावर दिसावं लागतं, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला काही तरी सांगू शकता. जर बावीशीचा मुलगा तुम्हाला शिकवत असेल तर ते कसं वाटेल? तुम्हाला तसा अनुभव तर असायला हवा”, असे सुबोध भावे म्हणाला.

आणखी वाचा : “मी एकुलती एक असल्याने…” लग्नाबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर प्रियदर्शनी इंदलकरची प्रतिक्रिया

“मला वयाने लहान असलेल्या मुलींबरोबर काम करायला काहीही समस्या नाहीत. दिग्दर्शकांनाही काहीही समस्या नाही. ‘तुला पाहते रे’मुळे मला सवय लागली. समस्या लोकांना आहे. ही त्या गोष्टीची गरज आहे. पण मीही या सर्व झोनमधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. काही वेगळे पात्र मिळतात का, याचाही मी शोध घेत आहे, असेही त्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा चित्रपट माझ्याकडे फार आधी आला होता. सलमान खान, आमिर खान या सर्व कलाकारांनी काहीही केलं तुम्हाला चालतं, पण मराठी कलाकारांनी काही करायचं म्हटलं तर तुमच्या पोटात दुखायला सुरुवात होते. ही समस्या आपल्याकडच्या बऱ्याचशा लोकांमध्ये आहे”, असा टोला सुबोध भावेने लगावला.