मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या परेश मोकाशींच्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाचं शीर्षक गीत सध्या सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. ‘नाच गं घुमा’ या गाण्यावर सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण व्हिडीओ बनवत आहे. अशातच या चित्रपटाचा निर्माता स्वप्नील जोशीच्या दोन्ही मुलांना सुद्धा ‘नाच गं घुमा’वर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही.

स्वप्नीलने त्याची मुलं ‘नाच गं घुमा’ गाण्यावर डान्स करत असल्याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये प्रेक्षकांना व स्वप्नीलच्या चाहत्यांना मायरा आणि राघवची झलक पाहायला मिळत आहे. अगदी लहान वयात सुद्धा मायरा-राघवने ‘नाच गं घुमा’ गाण्याच्या स्टेप्स हुबेहूब रिक्रिएट केल्या आहेत.

हेही वाचा : ‘येड लागलं प्रेमाचं’ : स्टार प्रवाहवर सुरू होणार नवीन मालिका! बैलगाडा शर्यतीचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले…

मायरा आणि छोट्या राघवच्या या भन्नाट डान्सवर केवळ नेटकऱ्यांनीच नव्हे तर या चित्रपटाच्या मुख्य नायिकांनी सुद्धा कौतुकाचा वर्षाव केला. अभिनेत्री मुक्ता बर्वेने या व्हिडीओवर “अरे वाह! मायरा राघव किती गोड” अशी कमेंट केली आहे. सुकन्या मोनेंनी या व्हिडीओवर “गोड…” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, नम्रता संभेरावने कमेंट सेक्शनमध्ये “मायरा राघव” लिहून त्यापुढे हार्ट इमोजी जोडले आहेत.

हेही वाचा : Video : मोठ्या भावाचे ‘ते’ शब्द ऐकताच भर कार्यक्रमात बॉबी देओल रडला; कपिल शर्माच्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मायरा-राघवचा हा गोड अंदाज प्रत्येकाच्या पसंतीस उतरला आहे. ‘नाच गं घुमा’बद्दल सांगायचं झालं, तर १ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.