‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटामधून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. आजवर तिने हिंदी मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. हिंदी ‘बिग बॉस’मुळे तर तिची लोकप्रियता आणखीनच वाढली. अभिनेता करण कुंद्राशी तिचं असलेलं नातं तर कायमच चर्चेत असतं. दोघंही प्रत्येक ठिकाणी एकत्रच दिसतात. तेजस्वीला प्रत्येक गोष्टीमध्ये करण पाठिंबा देतो. म्हणूनच ‘मन कस्तुरी रे’ या तिच्या पहिल्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यालाही करणने हजेरी लावली होती.
‘मन कस्तुरी रे’ चित्रपटामध्ये तेजस्वीसह अभिनय बेर्डे काम करताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी अभिनय बेर्डे व तेजस्वी प्रकाशने स्कुटीवरून धमाकेदार एन्ट्री केली. या चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या सगळीकडे चर्चा रंगत आहे. तसेच तेजस्वीचंही सोशल मीडियाद्वारे कौतुक होत आहे.
घर चालवण्यासाठी नोकरी करणाऱ्या सिद्धांतच्या (अभिनय बेर्डे) आयुष्यामध्ये जेव्हा श्रुतीची (तेजस्वी प्रकाश) एन्ट्री होते त्यानंतर नेमकं काय काय घडतं? हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे. संकेत माने दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर करणने आपल्या गर्लफ्रेंडचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
आणखी वाचा –वडिलांना देव मानणारा सनी देओल सावत्र बहिणीचं तोंडही पाहणं पसंत करत नाही, कारण…
विशेष म्हणजे करणने चित्रपटाचा ट्रेलर पाहून मराठीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “ट्रेलर खूप छान वाटला.” त्याने मराठीमध्ये दिलेली प्रतिक्रिया ऐकून तेजस्वीही अगदी खूश झाली. तसेच चित्रपट पाहण्याचं आवाहनही त्याने प्रेक्षकांना केलं. येत्या ४ नोव्हेंबर हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.