Yere Yere Paisa 3 Movie Fame Tejaswini Pandit : ‘येरे येरे पैसा’ सिनेमाचा तिसरा भाग आज ( १८ जुलै ) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या आधीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमात उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
‘येरे येरे पैसा’चा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला पहिला भाग या सिनेमातील प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. पहिल्या भागाच्या शूटिंगची सुरुवात साधारण २०१७ मध्ये झाली होती. या गेल्या ८ वर्षांच्या आठवणी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितल्या आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने संजय दादा, उमेश कामत, सिद्धार्थ यांच्याशी खूप चांगली मैत्री होऊन आमच्या एक नवीन नातं तयार झालं असं अभिनेत्रीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘येरे येरे पैसा’ सिनेमाच्या टीमसाठी तेजस्विनी पंडितची पोस्ट
२०१७ ते आतापर्यंत…
मी, UK ( उमेश कामत ), संजय दादा आणि बंडोपंत (सिद्धार्थ)
आम्ही चौघेही एका क्षेत्रात काम करत होतो.
एकमेकांना ओळखत होतो. पण जवळून नक्कीच नाही.
‘येरे येरे पैसा’च्या निमित्ताने एकत्र आलो आणि कायमचे एकमेकांचे झालो. कारण काही जखमा दिसत नाहीत. जखमा होण्याच्यी कारणं वेगवेगळी असली तरी प्रत्येकजण आयुष्यात कुठेतरी किंवा कुणाकडून तरी दुखावले गेलो होतोच आणि हाच आमच्यातला समानतेचा धागा होता.
रोज मनातली घालमेल सुरू असताना आम्ही एक कॉमेडी चित्रपट करत होतो आणि म्हणूनच आमच्या चेहऱ्यावर काही काळ का असेना, परकाया प्रवेशातून का असेना किंवा त्या नवीन मित्रांना जाणून घेण्याच्या प्रक्रियेमुळे असो; हसू उमलत होतं. जुन्या गोष्टी, जुनी दुःखं मागे पडत होती. यातच आमच्या मैत्रीची वीण घट्ट बसत गेली.
मग सेटवर होणाऱ्या वैयक्तिक चर्चा, दादरच्या Barista मध्ये, Orchid हॉटेलच्या Midnight Buffet च्या वेळी, हाजीअलीच्या सिताफळ क्रीमचा घास घेत, तर कधी बडेमियाच्या समोर उभ्या केलेल्या गाडीच्या बोनेट वर होऊ लागल्या…भेटी वाढत गेल्या. आधी काम, मग टाइमपास पासून सुरू झालेला हा प्रवास… आज कधी आयुष्यात चुकलो तर एकमेकांचे कान धरण्यापर्यंत कधी येऊन पोहोचला हे कळलंच नाही.
किंबहुना ८ वर्षांनी आज मागे वळून पाहताना जाणवलं ते फक्त वय वाढलंय आणि शरीर थोडं (Shape/Size) बदललंय,
बाकी गेल्या ८ वर्षांत चित्रपटाचं नावंही बदललं नाही (YYP3) आणि आमचं भक्कम नातंही
हा आता जखमा तेवढ्या सुगंधी झाल्यात!!!
तर प्रेक्षकहो,
आजपासून ‘येरे येरे पैसा ३’ हा आमच्या मैत्रीचा सिनेमा तुमच्या स्वाधीन करत आहोत आणि आमचा केंद्रबिंदू संजय दादाचा आज वाढदिवस आहे. त्याला आमच्या तिघांकडून प्रेम, शुभेच्छा आणि बरंच काही.
अरे अभी तो पार्टी शुरू हुई है!
तेवढं प्रेक्षक मित्र म्हणून तुम्ही पण पाठीवर शाबासकी द्यायला चित्रपटगृहात नक्की याल अशी आशा, अपेक्षा!
बाप्पा मोरया!
स्वामी ॐ!This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, तेजस्विनीने शेअर केलेल्या या पोस्टवर मराठी सिनेविश्वातील कलाकारांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवने, “आय लव्ह यू बंड्या” अशी कमेंट केली आहे. तर कुशल बद्रिकेने “किती भारी लिहिलंय” असं कमेंट्समध्ये म्हटलं आहे.