अलीकडच्या काळात अनेक मराठी कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर आपलं मत व्यक्त करत असतात. राजकीय असो किंवा सामाजिक सगळ्याच घडामोडींवर सध्याचे मराठी कलाकार ठामपणे आपली बाजू मांडतात. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडित. तेजस्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय परिस्थितीवर अनेकदा ती पोस्ट शेअर करत भाष्य करते. सध्या तेजस्विनीची अशीच एक एक्स (ट्विटर) पोस्ट चर्चेत आली आहे.

तेजस्विनी पंडितने तिच्या पोस्टच्या माध्यमातून राज्यातील सद्य सामाजिक स्थितीबाबत मोठा सवाल उपस्थित केला आहे. तसेच आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता असं मत मांडत तिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Lok Sabha Election 2024
“भाऊ म्हणून मी पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार”, रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “अजितदादा विसरले असतील, पण…”
What Uddhav Thackeray Said About Loksabha Election ?
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
jalgaon bjp marathi news, eknath khadse marathi news
“एकनाथ खडसे भाजपमध्ये येतील, तेव्हा…”, गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य

हेही वाचा : “‘साथिया’च्या सेटवर हजारोंची गर्दी जमली अन् शेवटी पोलिसांनी…”, विवेक ओबेरॉयने सांगितला किस्सा

“दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्षे सतावत आहेतच…आता सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज….? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता.” अशी पोस्ट अभिनेत्रीने केली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात झालेले गोळीबार, पुण्यात सापडलेलं सर्वात मोठं ड्रग्ज रॅकेट या पार्श्वभूमीवर अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : Video : तितीक्षा-सिद्धार्थची लगीनघाई! हळदी समारंभात नवरदेवाचा वडिलांबरोबर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

सध्या तेजस्विनीच्या एक्स पोस्टची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. निर्भिडपणे आपलं स्पष्ट मत मांडल्याने काही जणांनी तिला पाठिंबा दिला असून, अन्य काही जणांनी तेजस्विनीच्या पोस्टशी असहमती दर्शवली आहे.

दरम्यान, तेजस्विनीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीने नुकतंच पुण्यात सलोन सुरू केलं आहे. ती शेवटची ‘एकदा येऊन तर बघा’ या विनोदी चित्रपटात झळकली होती.