‘जर तरची गोष्ट’ या नाटकामुळे सध्या अभिनेता उमेश कामत चांगलाच चर्चेत आहे. उमेशने आतापर्यंत चित्रपट, मालिका, नाटक, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेता ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या दौऱ्यांमध्ये व्यग्र आहे. या नाटकाच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनी उमेश-प्रियाच्या जोडीने रंगभूमीवर पदार्पण केलं आहे.

हेही वाचा : “शेवट कधी करताय?”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील नवा ट्विस्ट पाहून प्रेक्षक वैतागले; म्हणाले, “अरे यांना…”

‘जर तरची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अभिनेत्याला त्याचे काही चाहते सोशल मीडियावर मेसेज करून त्यांच्या प्रतिक्रिया कळवत आहेत. उमेश अशा अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : चैतूची खऱ्या आईशी झालेली भेट, चिमीशी होणारी मैत्री आणि मोठा ट्वीस्ट; ‘नाळ २’ चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

उमेशने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याच्या चाहत्याने कोणाचंही कौतुक न करता अभिनेत्यासमोर एक वेगळीच व्यथा मांडली आहे. हा चाहता उमेशला म्हणतो, “माझी गर्लफ्रेंड नाराज झाली आहे. माझ्याशी बोलत नाही. आता १ महिना झाला मी तिला बोल म्हणतो पण…तिने आता मला ब्लॉक केलंय. दुसऱ्या नंबरने फोन केला तरी ऐकत नाही.”

उमेश कामतने त्याच्या चाहत्याने केलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर अभिनेत्याने, “याला मी आता कशी बरं मदत करू? ” असं कॅप्शन देत पुढे नि:शब्द प्रतिक्रिया दर्शवणारे इमोजी लावले आहेत.

हेही वाचा : ‘हे’ आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचं अभिनयाव्यतिरिक्त छुपं टॅलेंट, म्हणाली, “मला उत्तम…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Umesh Kamat
उमेश कामतची पोस्ट

दरम्यान, उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात दोघंही राधा आणि सागर या व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रिया-उमेशबरोबर या नाटकात पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.