गेल्या काही वर्षांमध्ये मराठी मनोरंजनसृष्टीत स्त्री प्रधान चित्रपटांची मोठ्या प्रमाणत निर्मिती झाली. मराठीमध्ये हलके-फुलके पण विचार करायला भाग पाडणारे चित्रपट बनवण्याची संख्या वाढली आहे. ‘झिम्मा २’, ‘बाई पण भारी देवा’ सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना हसवलही पण गंभीर विचार करायला भागही पाडले. आता अशाच स्त्रियांच्या विषयावर संबंधित नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

परेश मोकाशी दिग्दर्शित नाच गं घुमा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याचवर्षी मकर संक्रातीच्या मुहूर्तावर परेश मोकाशी यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात स्वप्नील जोशीसह मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते यांची प्रमुख भूमिका आहे.

हेही वाचा-“बायकोला सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर…”, ‘संघर्षयोद्धा’चा टीझर प्रदर्शित, मनोज जरांगे पाटलांची भूमिका कोण साकारणार?

या चित्रपटाची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे. येत्या मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मधुगंधाने आपल्या इन्स्टाग्रमावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिले “लेखिका जेव्हा निर्माती बनते. आता आतुरता ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची. मे महिन्यात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित ‘नाच गं घुमा’. मधुगंधाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Madhugandha Kulkarni (@madhugandhakulkarni)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधुगंधा कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, मालिका, चित्रपट नाटकाच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आल्या आहेत. अभिनयाबरोबर त्या एक उत्तम लेखिकाही आहेत. त्यांनी लिहिलेला ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपट चांगलाच गाजला. लेखनाबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या निर्मिती खाली तयार झालेला ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.