मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

जयंत सावरकर हे गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काल संध्याकाळपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती जयंत सावरकर यांचा मुलगा कौस्तुभ सावरकर यांनी दिली. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन, पुलंचा ‘अंतू बर्वा’ अजरामर करणारा कलावंत काळाच्या पडद्याआड

सुकन्या मोने यांनी इन्स्टाग्रामवर जयंत सावरकर यांच्याबरोबर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्यांनी जयंत सावरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. “माझा एव्हरग्रीन हिरो, तिथेही मस्त फिट राहाल ह्याची खात्री आहे. सगळ्यांना आपलंसं कराल. पण मी मात्र इथे खूप खूप मिस करेन तुम्हाला….. अण्णा”, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ नाकारणाऱ्या निर्मात्याने केदार शिंदेना केला मेसेज, म्हणाला “माझी बस चुकली, पण…”

दरम्यान जयंत सावरकर यांनी मराठी चित्रपट, नाटक, मालिका यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या प्रगल्भ अभिनयाचा ठसा उमटवला. जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वयाच्या विसाव्या वर्षी, १९५४ सालापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे),एकच प्याला (तळीराम) यांसारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी काम केले आहे.