सध्या सर्वत्र ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. तर या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि सर्व गाण्यांनाही प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. तर आता या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. तर अभिनेता अंकुश चौधरी याने या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता या चित्रपटाच्या एका शो दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “४ वर्ष तिने…” ‘महाराष्ट्र शाहीर’मधून लेकीला पदार्पणाची संधी देण्याबद्दल केदार यांनी स्पष्ट केलं मत

या चित्रपटात शाहीर साबळे यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे सुरू झाल्यावर चित्रपटगृहातील सर्व प्रेक्षक उठून उभे राहिले. इतकेच नाही तर, चित्रपटातील गाण्याच्या सुरात सूर मिसळत उभे राहून त्यांनी हे ‘महाराष्ट्र गीत’ गायले, असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. यावर कमेंट करीत नेटकरी या चित्रपटाचे आणि त्याचबरोबर प्रेक्षकांच्या या वागणुकीचे कौतुक करीत आहेत.

हेही वाचा : Photos: दाराबाहेर पत्रपेटी, जुना लाकडी दरवाजा…’असं’ आहे शाहीर साबळे यांचं मुंबईतील घर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात अंकुश चौधरीबरोबरच केदार शिंदे यांची लेक सना शिंदे आणि अभिनेत्री अश्विनी महांगडे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे.