Ashok Saraf’s Cute Little Fan : पद्मश्री-महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांनी आजवर त्यांच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रंगभूमी असो मालिका किंवा चित्रपट असो प्रत्येक माध्यमात अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘आम्ही सातपुते’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेड’ अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मराठीसह हिंदी कलाविश्वातही त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. अगदी अलीकडच्या काळातील लहान मुलं सुद्धा अशोक सराफ यांच्यावर भरभरून प्रेम करतात.

गेल्या काही महिन्यांपासून एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये लहान मुलगा अशोक सराफ यांच्या सदाबहार ‘अश्विनी ये ना!’ या गाण्यावर हटके एक्स्प्रेशन्स देत डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या चिमुकल्याचे खतरनाक हावभाव पाहून नेटकऱ्यांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे. आर्यन संजय काकडे असं त्याचं नाव आहे.

“मित्रांनी विचारलं, तुझा आवडता हिरो कोण? शाहरुख की सलमान खान? मी म्हणालो, अशोक मामा” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. चिमुकला आर्यन या व्हिडीओमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त हावभाव देत डान्स करत आहे. ‘अश्विनी ये ना’ या गाण्यावरील त्याचा डान्स पाहून निवेदिता सराफ सुद्धा भारावून गेल्या आहेत.

Ashok Saraf's Cute Little Fan
निवेदिता सराफ यांची खास कमेंट ( Ashok Saraf And Nivedita Saraf )

निवेदिता चिमुकल्याच्या डान्स व्हिडीओवर कमेंट करत सांगतात, “खूप छान बाळा… मी हा व्हिडिओ अशोकना दाखवला आणि त्यांना खूप आवडला” या कमेंटवर आर्यनच्या वडिलांवर “याहून मोठी गोष्ट नाही आमच्यासाठी… खूप खूप धन्यवाद” असा रिप्लाय देत अशोक व निवेदिता सराफ यांचे आभार मानले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, “हा व्हिडीओ पाहूनच मजा आली… काय भारी आहे हा मुलगा”, “कडक किती गोड मुलगा आहे”, “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात”, “अरे भाई नादखुळा मुलगा खरंच हुशार आहे”, “किती गोड आहे हा मुलगा मस्तच डान्स केलाय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.