Yek Number Marathi Movie : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला ‘येक नंबर’ चित्रपट १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आधारलेला आहे. यामध्ये अभिनेता धैर्य घोलप व अभिनेत्री सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, चित्रपटात राज ठाकरेंची व्यक्तिरेखा अभिनेता विशाल सुदर्शनवार याने साकारली आहे.

विशालने यापूर्वी ‘योद्धा’, ‘मर्दानी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या अभिनेता त्याच्या ‘येक नंबर’ ( Yek Number ) चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. चित्रपटात राज ठाकरेंची भूमिका साकारणारा विशाल जेव्हा खऱ्या आयुष्यात त्यांना भेटला, तेव्हा त्याची प्रतिक्रिया कशी होती याबद्दल अभिनेत्याने पोस्ट शेअर करत आपला अनुभव सांगितला आहे.

हेही वाचा : “धर्मवीर २ केवळ तुझ्या संयमामुळे…”, प्रवीण तरडेंच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगेश देसाईंची खास पोस्ट; म्हणाले…

विशाल सुदर्शनवार पोस्ट शेअर करत लिहितो, “दिवस होता १६ जानेवारी २०२४… माझ्या फोनची बेल वाजली. समोरून रोहन सर माझ्याशी संवाद साधत होते. “ज्युनिअर शाहरुख खान…ऑडिशनसाठी क्लीन शेव्ह करून ये” असं त्यांनी मला फोनवर सांगितलं. मी त्यांना आश्चर्य व्यक्त करत म्हणालो, “मी खरंच शाहरुख खान सारखा दिसतो का?” ते हसून म्हणाले…”तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि मला येऊन भेट” त्यानंतर मी ऑडिशन रुममध्ये जाऊन पोहोचलो.”

विशाल पुढे लिहितो, “जवळपास दोन वर्षांनी मी क्लीन शेव्ह करून ऑडिशनला गेलो होतो. शाहरुख खानच्या भूमिकेला साजेशा अशा काही ऑडिशन्स मी दिल्या. त्यानंतर रोहन सरांनी माझ्या हातात पांढरा सदरा आणि चष्मा दिला. पुढे सर म्हणाले, ऐक शाहरुख खानबद्दल आता विसर…आणि राज साहेबांना डोळ्यासमोर ठेवून ऑडिशन दे. रोहन सरांचे शब्द ऐकताच माझ्या काळजात एकदम धस्स झालं. माझं स्वप्न आज पूर्ण होणार होतं. मी लगेच माझा चष्मा नीट केला. व्यवस्थित तयार झाल्यावर आम्ही दिग्दर्शकाची वाट पाहत थांबलो होतो.

“तेवढ्यात आमच्या निर्मात्या तेजस्विनी पंडित मॅम तिथे आल्या. मनमोकळं स्मितहास्य करत त्यांनी मला अभिवादन केलं. त्यानंतर त्या म्हणाल्या…चल, दिग्दर्शकांना तुला भेटायचंय. त्यांनी मला गच्चीवर जाण्याचा मार्ग दाखवला. गच्चीत गेल्यावर मी डाव्या बाजूला वळलो आणि समोर स्वत: राजसाहेब बसल्याचं पाहिलं. जवळपास ६ वर्ष डोळ्यात साठवलेली त्यांची प्रतिमा, त्यांना टीव्हीवर पाहणं आणि त्यादिवशी त्यांना प्रत्यक्ष पाहणं हे सगळं भारावून टाकणारं होतं. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद, लोकांचं प्रेम पाहून प्रचंड आनंद झाला. डोळ्यात आनंदाश्रू होते…” अशी पोस्ट शेअर करत विशाल सुदर्शनवारने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हेही वाचा : तब्बल ५ वर्षांनी नवज्योत सिंग सिद्धू यांची कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा एन्ट्री; अर्चना म्हणाली, “माझ्या खुर्चीवर कब्जा…”

View this post on Instagram

A post shared by Vishal Sudarshanwar (@vishal_sudarshanwar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘येक नंबर’ ( Yek Number) चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये धैर्य घोलप, सायली पाटील, तेजस्विनी पंडित, पुष्कर श्रोत्री, संजय मोने, आनंद इंगळे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.