मराठी मनोरंजन विश्वात २०२३ मध्ये ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सहा अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तब्बल ७६.०५ कोटींची कमाई करून मराठी कलाविश्वात नवा रेकॉर्ड केला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन आज जवळपास ८ महिने उलटले तरी आजही ‘बाईपण भारी देवा’ची क्रेझ कायम आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. यासंदर्भात पोस्ट शेअर करून सुकन्या मोने यांनी माहिती दिली आहे. त्यांनी चित्रपटातील सहअभिनेत्रींबरोबर खास फोटो शेअर केला आहे. यात सगळ्यांच्या हातात ‘झी चित्र गौरव’ची ट्रॉफी पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : पैठणी साडी, नाकात नथ अन्…; पुरस्कार सोहळ्यासाठी शिल्पा शेट्टीचा पारंपरिक लूक, मराठीत संवाद साधत म्हणते…

सुकन्या मोने लिहितात, “‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार…. झी गौरव…. ‘ आम्हा सगळ्यांना मिळाला आणि त्याचप्रमाणे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी जो उत्तुंग प्रतिसाद आम्हाला दिलात त्यामुळे ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार… झी गौरव’ हा देखील पुरस्कार मिळाला. तुमच्या, आमच्या व आपल्या लाडक्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला असंच प्रेम, आशीर्वाद आयुष्यभर द्या. तुमचं प्रेम आमच्याबरोबर कायम असू देत. खास करून तमाम महिलांना मानाचा मुजरा ज्यांनी आम्हाला हा आनंद, हे उत्तुंग यश दाखवलं.”

हेही वाचा : “‘पठाण’मुळे आर्थिक संकट दूर झालं”, राणी मुखर्जीच्या पतीचे सगळे चित्रपट झालेले फ्लॉप, अनुभव सांगत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुकन्या मोनेंनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्यासह वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब यांची झलक पाहायला मिळत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.