शाहरुख खानने २०२३ मध्ये तब्बल ४ वर्षांच्या ब्रेकनंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं आणि गेल्यावर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटींचा गल्ला जमावला. ‘पठाण’मुळे केवळ शाहरुखचाच नव्हे तर यशराज फिल्म्सचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असं राणी मुखर्जीने नुकत्याच पार पडलेल्या FICCI Frames या कार्यक्रमात सांगितलं.

राणी मुखर्जी म्हणाली, “आदी ( आदित्य चोप्रा )कडे लॉकडाऊनच्या काळात अनेक बड्या बॅनरचे चित्रपट होते. परंतु, त्यावेळी सिनेमागृह बंद असल्याने आम्ही ते चित्रपट रिलीज करू शकलो नाही. त्या काळात माझा नवरा एकदम शांत होता. फिल्ममेकर्स ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करूया असं सारखं त्याला सांगायचे परंतु, सिनेमा हा थिएटरमध्ये पाहण्यासाठी बनवला जातो. या चित्रपटांना मी ओटीटीवर लगेच रिलीज नाही करणार या मतावर आदी ठाम होता. चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी आदीला बक्कळ पैसा ऑफर करण्यात आला होता पण, शेवटपर्यंत त्याने निर्णय बदलला नाही. आदीने वाट पाहणं योग्य समजलं. सिनेमागृह सुरू झाल्यावर आमचे अनेक सिनेमे फ्लॉप झाले. एक वेळ अशी आली की, सगळेजण मानसिक तणावात होते. प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला. पण, आदीकडे पाहून आम्ही शांत राहिलो. नक्कीच काहीतरी चमत्कार होईल असा त्याला विश्वास होता. माझ्या पतीने शेवटपर्यंत संयम ठेवला.”

allu arjun pushpa 2 The Rule movie first song pushpa pushpa promo out
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

हेही वाचा : सना तुझा अभिमान वाटतो! ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात केदार शिंदेंची लेक ठरली सर्वोत्कृष्ट…; शेअर केला खास फोटो

राणी मुखर्जी पुढे म्हणाली, “आदीचा विश्वास सार्थ ठरला आणि ‘पठाण’ चित्रपटामुळे सगळं काही व्यवस्थित झालं. ‘पठाण’मुळे यशराज फिल्म्सला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले. देव जेव्हा देतो… तेव्हा भरभरून देतो, फक्त काही काळ देव तुमची परीक्षा घेत असतो. आदीकडे खूप जास्त हिंमत होती. त्याच्या त्या सहनशीलतेला मी नेहमीच सलाम करेन.”

हेही वाचा : ना आलिया, ना दीपिका…; सारा तेंडुलकरला आवडते ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री, सचिनच्या लेकीने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

दरम्यान, २५० कोटींच्या बजेटमध्ये बनविण्यात आलेल्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हजार कोटींचा गल्ला जमावला होता. हा चित्रपट शाहरुखप्रमाणे यशराज फिल्म्ससाठी देखील महत्त्वाचा ठरला. यामध्ये किंग खानसह, जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.