मराठी चित्रपटात आता इतर भाषेतील चित्रपटांसारखे वेगवेगळ्या धाटणीचे विषय मांडले जात आहेत. चित्रपटगृह सुरु झाल्यापासून मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. पावनखिंड, शेर शिवराज, हंबीरराव सारख्या ऐतिहासिक चित्रपटांना देखील उत्तम यश मिळाले आहे.एकीकडे हिंदी चित्रपटांना बॉयकॉट करत आहेत तर मराठी चित्रपटांना गर्दी करत आहेत. नेहमीच्या पठडीतले चित्रपट न बनवता वेगळ्या विषयांवर चित्रपट बनवणारा दिग्दर्शक सुजय डहाके एक नवा चित्रपट घेऊन येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाळा, आजोबा, फुंतुर यानंतर साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर बेतलेला चित्रपट घेऊन येत आहे. आपल्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली. त्या पोस्टमध्ये तो म्हणतोय भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि आम्ही चित्रपटाची घोषणा केल्याच्या एक वर्षानंतर, मी तुम्हाला आमच्या श्यामची आई – श्यामची आई या चित्रपटाचा पहिला देखावा किंवा टीझर पोस्टर सादर करतो. ओम भुतकर ‘साने गुरुजी’ म्हणून

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director sujay dahake announced shyamchi aai new marathi film spg
First published on: 15-08-2022 at 16:27 IST