मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये केदार शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केदार शिंदे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच केदार शिंदे यांनी त्यांची पत्नी बेला शिंदे यांच्या भेटीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

केदार शिंदे यांनी काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी स्वत:चा आणि पत्नीचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो फार जुना असल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी अभिनेता अंकुश चौधरीची आठवणही काढली आहे. विशेष म्हणजे त्यांनी बेलासोबतच्या प्रेमाची सुरुवात नेमकी कशी झाली, याबाबत या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…

“अरुंधतीच्या आईला त्रास देण्याचे सिन लिहू नकोस नाहीतर…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

केदार शिंदे यांची पोस्ट

१ एप्रिल १९९१.. दोन वर्षांची उमेदवारी केल्यावर तीने (बेला शिंदे) मला होकार दिला. अंकुश चौधरी होता माझ्या सोबत. तीला भेटून ट्रेनचा प्रवास करत आम्ही दादर पुर्वेकडील एका इराणी हॅाटेलात चहा- बनमस्का खाताना, अचानक आठवलं “आयला अंकी, मला बेलाने एप्रिल फूल तर केलं नसेल ना?” त्यावेळी मोबाईल नव्हते. त्यात तीच्या घरच्या लॅंडलाईनवर फोन करण्याची हिंमत अजिबात नव्हती.

ती पुन्हा जोवर भेटली नाही तोवर माझ्यासाठी तीने एप्रिल फूल केलं यावर विश्वास ठेवण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण पण पण…. ती त्या १ एप्रिल रोजी माझ्या आयुष्यात आली ती, बेला के फूल बनून. आज १ एप्रिल २०२२.. घरातून निघण्याच्या आधी पुन्हा आम्ही त्या आठवणीत रमलो. अंकुश चौधरी तुला मीस केलं रे, असे केदार शिंदेंनी यात म्हटलं आहे.

वयाच्या ६० व्या वर्षी सैफ करतोय बाबा होण्याचा विचार? करीना कपूर सक्त ताकीद देत म्हणाली…

दरम्यान केदार शिंदे आणि बेला शिंदे या दोघांचाही प्रेमविवाह झाला आहे. गेल्यावर्षी ९ मे २०२१ मध्ये त्यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ते दोघे पुन्हा एकदा लग्नबेडीत अडकले होते. त्यांच्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.