सुधा प्रॉडक्शन या चित्रपट निर्मिती संस्थेच्या आगामी ‘आंधळी कोशिंबीर’ या धमाकेदार चित्रपटाची ध्वनिफित आणि वेबसाईट चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत मुंबईत एका शानदार सोहळ्यात प्रकाशित करण्यात आली. वेबसाईटचे प्रकाशन अभिनेत्री स्मिता लाड यांच्या हस्ते तर चित्रपटातील सुरेल गीतांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन अभिनेते सुनील बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निर्माती अनुया म्हैसकर आणि दिग्दर्शक आदित्य इंगळे सोबतच चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. येत्या ३० मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
या चित्रपटातून तीन पिढ्यांमधील कलाकार एकत्र येत आहेत. सोबतच ब-याच कालावधीनंतर अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिकेचा आस्वाद या चित्रपटामधून रसिकांना घेता येणार आहे. त्यांच्यासोबत वंदना गुप्ते, अनिकेत विश्वासराव, आनंद इंगळे, प्रिया बापट, हेमंत ढोमे, मृण्मयी देशपांडे, ऋषिकेश जोशी असे अनेक दिग्गज कलाकार काम करीत आहेत.
‘आंधली कोशिंबीर’ या चित्रपटाची कथा प्रताप देशमुख यांची असून पटकथा व संवाद आदित्य इंगळे आणि प्रताप देशमुख यांनी लिहिलेले आहेत. अनुया म्हैसकर यांच्या सुधा प्रॉडक्शनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी केले आहे.चित्रपटातील गीतांना शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, जान्हवी प्रभू अरोरा आणि विभावरी आपटे-जोशी यांनी आपला सुरेल आवाज दिला आहे. येत्या ३० मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2014 रोजी प्रकाशित
‘आंधळी कोशिंबीर’चे धमाकेदार म्युझिक आणि वेबसाईट लॉन्च
सुधा प्रॉडक्शन या चित्रपट निर्मिती संस्थेच्या आगामी ‘आंधळी कोशिंबीर’ या धमाकेदार चित्रपटाची ध्वनिफित आणि वेबसाईट चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत मुंबईत एका शानदार सोहळ्यात प्रकाशित करण्यात आली.

First published on: 12-05-2014 at 10:41 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie andhali koshimbir music launch