पु.ल.देशपांडे म्हटले की महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांचे मन अभिमानाने फुलून येते. या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे गारुड आजही मराठी माणसाच्या मनावर कायम आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ असं चित्रपटाचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता सागर देशमुख पु.लंची भूमिका साकारत आहे. जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये पु.लंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडताना दिसतात. मराठी साहित्यामध्ये विनोदाला एक वेगळे स्थान देण्यात पु.लं. यांचा मोठा वाटा आहे. कोणत्याही विषयावर नेमका विनोद करण्यात पु.लं यांचा हात कोणीच धरु शकत नव्हते आणि आजही शकणार नाही. हाच विनोद ट्रेलरमध्येही पाहायला मिळतो.

दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी ‘फाळकेज् फॅक्टरी’ या नावाने चित्रपट निर्मितीची नवी कंपनी सुरू केली असून या बॅनरअंतर्गत महेश मांजरेकर ‘भाई’ची निर्मिती करत आहेत. सागर देशमुखसोबतच चित्रपटात इरावती हर्षे, सचिन खेडेकर, मृण्मयी देशपांडे यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ४ जानेवारी २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie bhai vyakti ki valli trailer released sagar deshmukh iravati harshe mahesh manjrekar
First published on: 13-12-2018 at 10:36 IST