पंडित वसंतराव देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीतानं नटलेली एखादी बंदिश असो, वा चित्रपटातील भावगीत असो, अथवा नाट्यगीत असो या प्रत्येक संगीत प्रकारावर वसंतरावांची गायकी आपला ठसा उमटवून जाते. वसंतरावांची सांगितिक कारकीर्द अनेकांना माहित आहे. परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, त्यांच्या सांगितिक प्रवासाविषयी कमी माहिती आहे? आणि नेमका हाच प्रवास ‘मी वसंतराव’ या चित्रपटाद्वारे मध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘मी वसंतराव’ हा सुरांची सांगितिक मैफील असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

तुमचं घराणं कोणतं, या खोचक प्रश्नावर ‘माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरू होतं’ हे धाडसी उत्तर देण्याची ताकद असलेल्या पं. वसंतराव देशपांडे यांनी स्वताःला त्यांच्या गायकीतून सिद्ध केलं. वसंतरावांची गोष्ट म्हणजे अक्षरशः अनेक अडथळ्यांवर, संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वताःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या प्रवासाची ही गोष्ट आहे.

‘मी वसंतराव’ या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा नुकताच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. ‘मी वसंतराव’च्या प्रवासाबद्दल राहुल देशपांडे म्हणतात, ”आपण स्वतःचा जितका चहुबाजूनं शोध घेऊ, तितकं आपण समृद्ध होतो. याचा अनुभव मला ‘मी वसंतराव’ करताना आला. या प्रवासात एक कलाकार आणि मुख्य म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी वृद्धिंगत झालो. आजोबा आणि त्यांची गायकी हा माझ्यासाठी मुळात जिव्हाळ्याचा विषय. मला आजोबांचा सहवास जास्त लाभला नाही.

“मात्र आजीकडून, आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींकडून मला त्यांना समजून घेता आलं. त्यांची गाणी ऐकली, रेकॉर्डिंग्स पाहिले. त्यातील बारकावे, हावभाव याचा मी अभ्यास केला. वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर आजोबांमधील बदल माझ्यात उतरवणं माझ्यासाठी तसं आव्हानात्मक होतं. मला शारीरिक मेहनतही तितकीच घ्यावी लागली. कुठेही त्यांच्या व्यक्तिमत्वाला धक्का पोहोचू नये, याची माझ्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम पुरेपूर काळजी घेत होतो. ‘मी वसंतराव’ म्हणजे त्यांच्या जीवनकार्याला वाहिलेली आदरांजली आहे.” असेही राहुल देशपांडे म्हणाले.

‘The Kashmir Files’ चे रेटिंग घसरल्यामुळे संतापले विवेक अग्निहोत्री, म्हणाले “हे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.