मराठी चित्रपटाच्या पडद्यावर सध्या लग्नाची गोष्ट हुकमी झाली आहे. ‘टाईम प्लीज गोष्ट लग्नानंतरची’, ‘लग्न पहावे करून’ या चित्रपटानंतर आता ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ येईल. आणखीनही काही चित्रपटातून लग्नबंबाळ गोष्टी येतील. कोणी विवाहसंस्था कशी महत्वाची आहे हे सांगेल तर कोणी लिव्हइन रिलेशनशीपचे धोके सांगेल. मग घटस्फोटाचा घरातल्या लहान मुलांवर बरा-वाईट परिणाम होतो यापासून विवाहबाह्यसंबंधाचे धोके वगैरे वगैरे वळणे घेत, घाट पार करत करत हे विषय आता वाढतील. काही रंगतीलही, तर काही बस्स झाले म्हणायची वेळ येईल.
तूर्त येथे काही लग्नाळू चित्रपटांसाठी नावे सुचवत आहोत. काय सांगावे, काही जणाना नावावरून चित्रपटाची कथा सुचायची.
वर पाहिजे वधु पाहिजे, लग्नाचा धूम धडाका, पहिल्या लग्नाची दुसरी गंम्मत, सून येती घरा, लग्नाचा धांगडधिंगा, लग्न असावे असे, शहरात लग्न गावात वरात, नवरा आला बदलून, माझी लग्नाची बायको