झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि मायरा वायकुळ ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेतील नेहा आणि परीची केमिस्ट्री प्रेक्षकांना हवीहवीशी वाटत आहे. या मालिकेतील परी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच परीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सोशल मीडियावर अतरंगी रे या चित्रपटातील चका चक हे गाणे प्रचंड ट्रेंड होत आहे. या गाण्यावर बरेच जण रिल व्हिडीओ बनवताना पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने या गाण्यावर डान्स केला आहे. या डान्समधील तिचे मूव्ह्स आणि स्टेप्स फॉलो करत त्याला कॉपी करुन नाचण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहे.

नुकतंच मायरा म्हणजे लाडक्या परीनेही याच गाण्यावर डान्स करतानाचा एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ ती हुबेहुब सारा अली खानप्रमाणे नाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात तिच्या चेहऱ्यावरील हावभाव फारच गोड आहेत. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

‘मुलगी झाली हो’ मधील विलास पाटलांनी ट्रोलिंगला दिले सडेतोड उत्तर, म्हणाले “मी छत्रपती शिवरायांचा मावळा…”

परीच्या या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे. फार सुंदर, खूप छान अशा विविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे एकाने फार सुंदर डान्स आणि हावभाव अशी कमेंट केली आहे. तसेच परीच्या या व्हिडीओवर कमेंट करताना अनेकांनी सारा अली खानलाही हा व्हिडीओ टॅग केला आहे. मात्र तिने या व्हिडीओ अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mazi tuzi reshimgaath serial fame pari myra vaikul dance on sara ali khan chaka chak song nrp
First published on: 09-01-2022 at 14:37 IST