‘मंटो’ चित्रपटाची दिग्दर्शिका नंदिता दास हिचे वडील जतिन दास यांच्यावरही निशा बोरा या महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. जतिन दास हे प्रसिद्ध चित्रकार असून निशा यांच्या आरोपानंतर त्यांनी प्रथमच या प्रकरणी  मौन सोडलं आहे.

‘निशा बोरा यांनी माझ्यावर केलेले लैंगिक शोषणाचे आरोप बिनबुडाचे असून या सगळ्याशी माझा काहीच संबंध नाही. त्या असं का वागत आहेत हे माहित नाही. परंतु या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही,अशी प्रतिक्रिया जतिन दास यांनी दिली आहे.

पुढे ते असंही म्हणाले, ‘सध्या जे काही सुरु आहे ते प्रचंड गलिच्छ आणि अपमानास्पद आहे. माझ्याविरुद्ध या महिला असे आरोप का करतायेत हेच समजत नाहीये’.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, निशा बोरा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून जतिन दास यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. निशा यांच्या आरोपानंतर आणखी एका महिलेनेही जतिन यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवला होता. मात्र जतिन दास यांनी याविषयी आतापर्यंत मौन बाळगणं पसंत केलं होतं. विशेष म्हणजे या साऱ्या आरोपानंतर जतिन दास यांच्या मुलीने नंदिता दासने मात्र #MeToo मोहिमेलाच पाठिंबा देण्याचा निर्धार करत कायम अन्याय झालेल्या महिलांच्या पाठीशी उभी असेन असं म्हटलं होतं.