Metro In Dino Collection Day 6 : अनुराग बासू यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘मेट्रो… इन दिनों’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. चांगली कमाईदेखील केली आहे. अनुराग बासू यांच्या ‘मेट्रो… इन दिनों’ या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.५ कोटी रुपये कमावले. पहिल्या दिवसाच्या कलेक्शननुसार, चित्रपट बॉक्स ऑफिसवर संतुलित राहिला आहे. ‘मेट्रो… इन दिनों’ने सहाव्या दिवशी अंदाजे २.२५ कोटी रुपये कमावले आहेत.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘मेट्रो… इन दिनों’ने सहा दिवसांत अंदाजे २४.५० कोटी रुपये कमावले आहेत. अनुराग बासू दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.५ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सहा कोटी रुपये आणि रविवारी ७.२५ कोटी रुपये कमावले. अशा प्रकारे चित्रपटाने तीन दिवसांत १६.१७ कोटी रुपये कमावले.
‘मेट्रो… इन दिनों’ने सहा दिवसांत २४.५० कोटी रुपये कमावले
वीकेंडला चांगली कामगिरी केल्यानंतर, ‘मेट्रो… इन दिनों’ने चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी २.५ कोटी रुपये व मंगळवारी तीन कोटी रुपये कमावले. सहा दिवसांत २४.५० कोटी रुपये कमावले हे सरासरी कलेक्शन मानले जाते. निर्माते चित्रपटाच्या कलेक्शन आणि पुनरावलोकनांवर खूश आहेत. चित्रपटाला अजूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
‘मेट्रो… इन दिनों’ हा ‘लाइफ… इन अ मेट्रो’चा सीक्वेल आहे
‘‘मेट्रो… इन दिनों’ हा २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाइफ… इन अ मेट्रो’चा सीक्वेल आहे, ज्याचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले होते. या चित्रपटात इरफान खान कोंकणा सेन शर्माबरोबर होते. या सीक्वेलमध्ये कोंकणा ही एकमेव अभिनेत्री होती, जिने पहिल्या भागात काम केले होते. हा सीक्वेल चार नवीन जोडप्यांच्या आयुष्यातील प्रेम आणि नातेसंबंधांमधील चढ-उतार दाखवतो, जे प्रत्येक पिढीतील लोकांचे प्रतिनिधित्व करतात.
‘मेट्रो… इन दिनों’ या चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता, अनुपम खेर, अली फजल आणि फातिमा सना शेख यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले आहे.