‘रसोड़े में कौन था…’, सासू सोबत फोटो शेअर करत मीरा राजपूतनेच केला नेटकऱ्यांना प्रश्न

मीराने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

mira rajput, neelima azeem,
मीराने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतचे लाखो चाहते आहेत. मीराची लोकप्रियता कोणत्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. मीरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच मीराने तिच्या सासूसोबत म्हणजेच नीलिमा अजीमसोबत एक फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हारलरल झाला आहे.

मीराने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत मीरा आणि नीलिमा दिसत आहेत. मीराने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर नीलिमा यांनी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत मीराने लिहिलं की ‘रसोड़े में कौन था। तुम्ही पैज लावू शकता की आमच्या दोघांपैकी कोणी नव्हतं. चहा आणि चिक्की आणा.’

आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?

आणखी वाचा : बिग बींची पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटीस; जाणून घ्या कारण…

मीरा राजपूतचे शाहिदची आई आणि त्याच्या सावत्र भावाशी खूप चांगले संबंध आहेत. ती बऱ्याचवेळा त्या दोघांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. दरम्यान, शाहिद लवकरच जर्सी चित्रपटात दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mira rajput shares adorable photo with mother in law neelima azeem and asks rasode mein kaun tha dcp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या