‘मिस अर्थ पिजेन्ट’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी ‘मिस इंडिया अर्थ’ शोभिता धुलिपालने ‘मिस इको ब्युटी’ हा किताब पटकावला आहे. याआधी याच स्पर्धेतील ‘मिस फोटोजनिक’ हा किताबदेखील तिने मिळवला आहे. शोभिता टि्वटरवरील आपल्या संदेशात म्हणते – “मिस इको ब्युटी” : सुवर्ण पदक : इंडिया! सर्वांचे आभार. अनेक धन्यवाद! खूप आनंद झाला.” याच स्पर्धेतील ‘मिस फोटोजनिक’ विभागात प्रथम येऊन, मिस वर्ल्ड एश्वर्या राय बच्चन आणि डयना हेडन यांच्यानंतर हा किताब जिंकणारी ती तिसरी भारतीय महिला असल्याचे विस वर्षीय शोभिताने टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे. शोभिताने टि्वट केलेला संदेश – “आंतरराष्ट्रीय स्थरावर एश्वर्या राय आणि डायना हेडननंतर ‘मिस फोटोजनिक’ किताब जिंकणारी मी तिसरी भारतीय ठरले. १६ वर्षांनंतर. खूप आनंद वाटत आहे, धन्यवाद!!” ‘मिस अर्थ पिजेन्ट’ची अंतिम स्पर्धा ७ डिसेंबरला (उद्या) फिलिपिन्समधील पसाय शहरात होणार आहे.