मिस युएसए २०१९ चा मुकुट जिंकणारी अमेरिकन मॉडेल चेस्ली क्रिस्ट (Cheslie Kryst) हिच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. चेस्लीने ६० मजली इमारतीच्या २९ व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तिने मृत्यूच्या काही तास आधी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. सध्या तिची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, चेस्ली क्रिस्ट हिने वयाच्या ३० व्या वर्षी आत्महत्या केली आहे. युएसएमधील मॅनहॅटनमधील ६० मजली ओरियन बिल्डींगमधील ९ व्या मजल्यावर ती राहत होती. ३० जानेवारीला सकाळी ७.१५ वाजता (युएसए वेळेनुसार) तिने आत्महत्या केली. चेस्ली ही शेवटची त्या इमारतीवरील २९ व्या मजल्यावर दिसली होती. त्यानंतरच तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

चेस्लीने तिच्या मृत्यूपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्टवर शेअर केली. यासोबत तिने एक फोटो पोस्ट केला आहे. ‘हा दिवस तुम्हाला आराम आणि शांती घेऊन येवो’, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. तिच्या या पोस्टनंतर काही तासांनी तिने आत्महत्या केली.

दरम्यान चेस्लीच्या मृत्यूवर मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने शोक व्यक्त केला आहे. हरनाझने चेस्लीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत “हरनाझ आणि चेस्ली हसताना दिसत आहे. हे अत्यंत हृदयद्रावक आणि अविश्वसनीय आहे. तू नेहमीच अनेकांसाठी प्रेरणास्थान होती. तुझ्या आत्म्याला शांती मिळो,” अशा शब्दात हरनाझने शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान पोलिसांना चेस्लीच्या घरी सुसाईड नोट आढळली आहे. यात तिने माझ्या नावावर असलेल्या सर्व गोष्टी आईच्या नावे करावे, असे म्हटले आहे. मात्र तिने आत्महत्या का केली? हे यात नमूद करण्यात आलेले नाही.

चेस्ली क्रिस्टने २०१९ मध्ये नॉर्थ कॅरोलिनाचे प्रतिनिधित्व केले होते. तिने मिस यूएसए २०१९ चे विजेतेपद पटकावले होती. ती व्यवसायाने वकील आहे. ती उत्तर आणि दक्षिण कॅरोलिनामध्ये कायद्याची प्रॅक्टिस करत आहे. चेस्ली ही वकील, फॅशन ब्लॉगर आणि एक्स्ट्रा टीव्ही या शोची सूत्रसंचालकसुद्धा होती.

So Hot! म्हणत कंगनाने शेअर केला नवाजुद्दीनचा खास लूकमधील ‘तो’ फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेस्लीचा जन्म १९९१ मध्ये मिशिगनमध्ये झाला. दक्षिण कॅरोलिनामध्ये ती लहानाची मोठी झाली होती. तिने दक्षिण कॅरोलिना विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि २०१७ मध्ये वेक फॉरेस्ट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून पदवी प्राप्त केली. तिने नॉर्थ कॅरोलिना फर्म Poyner Spruill LLP येथे दिवाणी वकील म्हणून काम केलं आहे.