मॉडेल लिंडा इवेंजेलिस्टा हे फशन जगतातील एक लोकप्रिय नाव आहे. ८०-९० च्या दशकात लिंडाने अनेक शोमध्ये मोठ्या डिझायनरसाठी रॅम्प वॉक केलंय. तसचं नावाजलेल्या मॅगझिन्सच्या कव्हर पेजवर ती झळकली आहे. मात्र लिंडाने नुकताच तिच्यावर चुकीची कॉस्मेटिक सर्जरी झाल्याचा दावा करत ५० मिलियन डॉलरचा खटला दाखल केला आहे. या सर्जरीमुळे तिला क्रूरपणे विकृत बनवण्यात आल्याचं ती म्हणाली आहे. या सर्जरीमुळे लिंडाला ओळखणं देखील कठीण झालं असल्यामुळे याचा परिणाम तिच्या संपूर्ण करिअरवर झाल्याचं दु:ख तिने व्यक्त केलंय.
लिंडाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये ती म्हणाली, “.”एका चुकीमुळे मी जे पाच वर्ष भोगलं आहे. त्याबद्दल आज व्यक्त होण्यासाठी एक पाऊल मी पुढे टाकलं आहे. माझ्यासोबतच्यांच काम चांगल सुरु असताना मी काम का करत नाही असा प्रश्न माझ्या अनेक चाहत्यांना पडला आहे. तर याचं कारण म्हणजे झेलटिकच्या कूलस्कल्पिंग प्रक्रियेने मी पूर्णपणे विकृत दिसू लागले आहे. मला जे सांगितलं गेलं होतं त्याच्या पूर्णपणे उलट घडलं आहे.” असं लिंडाने सांगितलं.
जेव्हा अथिया शेट्टी केएल राहुलचा व्हिडीओ कॉल उचलत नाही!; ‘अशी’ होते त्याची अवस्था
या सर्जरीमुळे लिंडाला पॅराडॉक्सिकल एडीपोज हाइपरप्लासिया (PAH) नावाच्या साईड इफेक्टचा सामना करावा लागला होता. यामुळे सर्जरी झालेल्या भागात सूज येते. या आजारामुळे लिंडाचं करियर तर संपलंच मात्र यामुळे तिला नैराश्यचा सामना करावा लागल्याचं तिने सांगितलं.
पाच वर्ष मौन बाळगल्यानंतर लिंडाने अखेर न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहेत. लिंडाने न्यूयॉर्क फेडरेशन कोर्टात झेल्टीक या कंपनीविरोधात निष्काळजीपणा, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि ग्राहकांना संभाव्य दुष्परिणामांबाबत चेतावणी न दिल्याचा आरोप केला आहे. लिंडाने मांडी, पोट, पाठ आणि हनुवटीवरील चरबी कमी करण्यासाठी २०१५ आणि २०१६ सालामध्ये अनेक सर्जरी केल्या होत्या. मात्र यामुळे लिंडाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
ज्युनिअर एनटीआरनं त्याच्या लॅम्बॉर्गिनीसाठी घेतली १७ लाखांची नंबर प्लेट; गाडीचा नंबर आहे…
या सर्जरीनंतर पाच वर्षांनी लिंडाने या कंपनी विरोधात ५० मिलियनचा दावा केला आहे. सर्जरीमुळे चेहरा बिघडल्याने २०१६नंतर लिंडाने मॉडेलिंगमधून काहीच कमाई केली नसल्याचा खुलास केलाय.