‘देवो के देव महादेव’ या मालिकेतून प्रकाश झोतात आलेला अभिनेता मोहित रैनाने चार जणांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोहित विषयी एक विचित्र दावा केला जातं आहे. याला पाहता मोहितने गोरेगाव पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. मोहितने ही तक्रार सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘सेव्ह मोहित’ या मोहिमेवरून केली आहे.
मोहित राना विषयी त्याची स्वयंघोषित शुभचिंतक सारा शर्माने सोशल मीडियावर ‘सेव्ह मोहित’ मोहीम ही चालवली होती. तिच्या म्हणण्यानुसार, मोहितच्या जिवाला धोका आहे. सुशांत सिंह राजपूतप्रमाणे मोहित रैनाचाही मृत्यू होऊ शकतो. हे पाहता स्वत: मोहित आणि त्याच्या कुटुंबाने पुढे येऊन ते सगळे अगदी ठणठणीत आहेत असे सांगितले आहे.
View this post on Instagram
या घटनेनंतर मोहितने न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार, बोरिवली न्यायालयाने संबधित पोलिसांना मोहितचा जबाब नोंदवून तपास करण्याच्या सूचना दिल्या. तर, गोरेगाव पोलिसांना दिलेल्या जबाब मध्ये मोहितले सांगितले की त्याला सारा शर्मा आणि तिच्यासोबत परवीन शर्मा, आशिव शर्मा, मिथीलेश तिवारी हे त्रास दित आहेत.
आणखी वाचा : ‘राधे माँ’, यामी गौतमचा लग्नातील ड्रेस पाहून कलाकारांनी उडवली खिल्ली
मोहितच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या चौघांवर कलम ३८४ आयपीसी अंतर्गत गुन्हेगारी कट रचने, पोलिसांना चुकीची माहिती देणे, धमकी देणे आणि खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास गोरेगाव पोलिस करत आहेत.
आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य
‘देवो के देव महादेव’ या मालिकेसोबत मोहितने ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपट आणि ‘भौकाल’, ‘काफिर’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.