बिग बॉस ओटीटीमधून चर्चेत आलेली मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी कायम चर्चेत असते. उर्फी ही कायम सोशल मिडियावर चित्रविचित्र कपडे घालून फोटोज, रील्स शेअर करत असते. तिचा चाहतावर्ग जरी मोठा असला तरी तिला ट्रोलही तितकंच केलं जातं. नुकताच तिने विवस्त्र होऊन फक्त शंखांनी स्वतःचं शरीर झाकल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. उर्फीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तुम्हाला असेच चित्रविचित्र अवतरातले फोटोज पाहायला मिळतील.

उर्फीला बऱ्याच मुली कॉपी करतात पण आता तर चक्क एका मुलाने उर्फीच्या या विचित्र पेहरावाची नक्कल केली आहे आणि तो व्हिडिओ सध्या सोशम मीडियावर चांगलाच गाजतोय. सोशल मीडियावर या मुलाचा हटके लूक उर्फी जावेदलाही टक्कर देणारा ठरतोय. भारतीय टिकटॉकर, व्लॉगर आणि डान्सर मोनू देओरी हा सोशल मीडियावर बराच लोकप्रिय आहे. शिवाय इंडियाज बेस्ट डान्सर या शोमध्येही मोनूने भाग घेतला होता. त्याचे रील्स आणि डान्स व्हिडिओज चांगलेच व्हायरल होत असतात. आता त्याने उर्फीलाही टक्कर देणारा व्हिडिओ पोस्ट केल्याने तो आणखीनच लोकप्रिय होत आहे.

आणखी वाचा : छोटा पडदा गाजवणारा हार्दिक जोशी दिसणार ऐतिहासिक चित्रपटात; ‘हर हर महादेव’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

या व्हिडिओमध्ये त्याने उर्फीची एकप्रकारे खिल्ली उडवली आहे. केवळ अंतरवस्त्र घालून आणि शरीरावर झाडांची पाने लावून मोनूने उर्फीच्या स्टाईलमध्ये ड्रेसिंग सेन्सबद्दल लोकांना झापलं आहे. उर्फी एकदा मध्यंतरी एका प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीवर अशीच चिडली होती. “माझ्या ड्रेसिंग सेन्सबद्दल कुणीच बोलायचं नाही, मी उर्फी जावेद आहे मला कुणी ट्रोल करू शकत नाही.” अशी मुक्ताफळं उर्फीने तेव्हा उधळली होती.

View this post on Instagram

A post shared by Monu Bikomiya Deori (@monudeori)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फीच्या त्याच व्हिडिओची पुनरावृत्ती मोनूने केली आहे शिवाय यात त्याने उर्फीसारख्याच केलेल्या विचित्र पेहरावामुळे तो जास्त चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये मोनूने उर्फीची हुबेहूब नक्कल केली आहे. पापराजी यांच्यावर भडकणाऱ्य उर्फीची तर त्याने अगदी उत्तम नक्कल सादर केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. खुद्द उर्फीनेदेखील मोनूच्या या व्हिडिओची दखल घेतली आहे. विचित्र कपडे घालून लोकांवर डाफरणाऱ्या उर्फीपेक्षा हा मोनू निदान हसवतो तरी असं म्हणत काहींनी उर्फीवर टीका केली तर काहींनी या दोघांचं कौतुक केलं आहे.