सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘२.०’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीला सुरुवात झाली आहे. करोडोंचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाची प्रसिद्धीसुद्धा त्याच भव्य पद्धतीने करण्यात येत आहे. नुकतच या चित्रपटाचं नाव असणारा जवळपास १०० फूट उंचीचा एक हॉट एअर बलून लॉस एंजलिसजवळील जगप्रसिद्ध हॉलिवूड साइनेजवरुन गेल्याचं पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या हॉट एअर बलूनवर रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचे चेहरेसुद्धा पाहायला मिळत आहेत. ‘द वर्ल्ड इज नॉट ओन्ली फॉर ह्युमन्स’ अशी टॅगलाइनही त्यावर पाहायला मिळाली. भारतातील बिग बजेट चित्रपटांच्या यादीतील एक चित्रपट म्हणजेच ‘२.०’ च्या प्रसिद्धीसाठी लढवण्यात आलेली ही शक्कल सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटाची अशा प्रकारे प्रसिद्धी करण्याचं हे तंत्र सध्या चांगलच गाजत आहे. सोशल मीडिया आणि चित्रपट वर्तुळातही याविषयीच्याच चर्चा सुरु आहेत.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

‘२.०’चा हा हॉट एअर बलून विविध बलून फेस्टिव्हलमध्येही उडवण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉस एंजलिस, सॅन फ्रान्सिस्को, लंडन, दुबई आणि ऑस्ट्रेलिया या सर्व ठिकाणांना भेट दिल्यानंतर हा हॉट एअर बलून भारतात आणण्यात येणार आहे. या चित्रपच्या प्रसिद्धीसाठी नवनवीन मार्गांचा अवलंब केला जाणार असल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्याशिवाय अभिनेत्री अॅमी जॅक्सनसुद्धा या चित्रपटात झळकणार आहे. शंकर यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात रजनीकांत दुहेरी भूमिका साकारणार असल्याचंही कळतंय.

वाचा : जाणून घ्या, मराठी कलाकारांचे मानधन

प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने तब्बल १९० कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटाचे थिएटर राइट्स ८० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. इतकंच नव्हे तर, सिनेमाचे सॅटेलाइट राइट्स ‘झी टिव्ही’ने ११० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie 2 0 rajinikanth akshay kumar films hot air balloon to flaunt india hollywood photos
First published on: 28-06-2017 at 14:44 IST