सलमान खानच्या लग्नाच्या चर्चा नेहमीच रंगत असतात हे खरं. पण, सोशल मीडियावर रंगणाऱ्या या चर्चांना सलमानच्या एका ट्विटने वेगळच वळण दिलं असं म्हणायला हरकत नाही. कारण, खुद्द सलमाननेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘मुझे लडकी मिल गई’ असं ट्विट करत सर्वांनाच थक्क केलं आहे.

‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमानचं हे ट्विट पाहता त्याच्या आयुष्यात अखेर ‘ती’ आलीये, असं म्हणत अनेकांनीच आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली. इतकच नव्हे, तर काहींनी तर तिचा शोध घेण्यासही सुरुवात केली. सलमानच्या आयुष्यात आलेल्या तिच्याबद्दल जाणून घेताना त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसींचा आणि त्याच्याशी नाव जोडल्या गेलेल्या अभिनेत्रींची नावंही पुढे आली.

VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा

एका ट्विटमुळे थेट आपल्या खासगी आयुष्याविषयी तर्क लावण्यास सुरुवात झाल्याचं पाहून काही वेळाने त्याने आणखी एक ट्विट केलं. या ट्विटमधून सलमानने थेट तिचा फोटोच पोस्ट केला आहे. मुख्य म्हणजे या फोटोसोबत त्याने लिहिलेलं ट्विट पाहून उत्साहाची ही लाट क्षणातच ओसरल्याचं पाहायला मिळालं. कारण, सलमानला लग्नासाठी कोणी मुलगी भेटली नसून, ‘लवरात्री’ या चित्रपटासाठी अभिनेत्री भेटली आहे. वरिना असं तिचं नाव असून, सलमानने पोस्ट केलेला तिचा मोहक फोटो सध्या नेटकऱ्यांची मनं जिंकतोय.

सलमानची बहीण अर्पिता खान शर्माच्या पतीची म्हणजेच आयुष शर्माची मुख्य भूमिका असणाऱ्या लवरात्री या चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध संपला असल्याचंच जणू सलमानने हे ट्विट करत स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सलमानचा हा अनोखा फंडा प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचवून गेला असं म्हणायला हरकत नाही.