किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर भाष्य करणा-या ‘बॉईज’ या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. घरापासून दूर बोर्डिंगमध्ये राहत असलेल्या तीन मित्रांची ही दुनिया प्रेक्षकांना आवडत असून, चक्क बॉलिवूडचे शहेशनशहा अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाला विशेष दाद दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : गौहर खानशी साखरपुडा मोडल्यावर हा प्रसिद्ध दिग्दर्शक अजूनही आहे अविवाहित

८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील कलाकारांनी नुकतीच बिग बी यांची भेट घेतली होती. त्यादरम्यान, त्यांनी सिनेमाच्या ट्रेलरचे कौतुक करत ‘बॉईज’ सिनेमा आवर्जून पाहणार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड या सिनेमातील मुख्य कलाकारांसोबत सेल्फी काढत त्यांनी संपूर्ण टीमला प्रोत्साहित केले. अभिनयाचा बादशहा असलेल्या अमिताभ यांच्या शुभाशीर्वादामुळे या सिनेमाचा दर्जा आणखीनच वाढला आहे.

वाचा : अनिल कपूरच्या मुलींचं नाव पाठीवर गोंदवणारा ‘हा’ तरुण कोण?

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून, अवधूत गुप्ते प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर आला आहे. या चित्रपटात संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमेनिस आणि वैभव मांगले या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrathi movie boyz cast selfie with amitabh bachchan
First published on: 08-09-2017 at 08:36 IST