सिद्धहस्त लेखक जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि मराठी रंगभूमी गाजवणारं पुरुष नाटक पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण या नाटकावर आधारित वेब सीरिज आता प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. पुरुष हे नाटक लेखक जयवंत दळवी यांनी पुरुषी मनोवृत्ती आणि खासकरुन ज्यांचा उल्लेख गेंड्याची कातडी असलेला पुढारी असा केला जातो अशा लोकांची मानसिकता ही कशी असते हे दाखवणारं नाटक होतं. हे नाटक जेव्हा रंगभूमीवर आलं तेव्हा नाटकात गुलाबराव जाधव हे पात्र नाना पाटेकरांनी साकारलं होतं. तर अंबू हे पात्र रिमा लागू यांनी साकारलं होतं.

पुरुष या नाटकाचं कथानक काय?

पुरुष या नाटकाची नायिका अंबिका आहे. तिचे वडील शिक्षक आहेत. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. एका शिक्षकाच्या घरातली संस्कारक्षम मुलगी पुरुष प्रधान संस्कृतीशी बरोबरी करु पाहते. समाजातल्या पुरुषांबरोबर खांद्याला खांदा मिळवून काम करु पाहते. हे सगळं गुलाबराव जाधव या निर्ढावलेल्या पुढाऱ्याला बघवत नाही. एका पुरुषी अहंकारातून तो तिच्यावर बलात्कार करतो. इतक्या मोठ्या आघाताने अंबिका खचून जाईल असं गुलाबराव जाधवाला वाटत असतं पण तसं घडत नाही. उलट ती त्याला धडा शिकवते. असं या नाटकाचं थोडक्यात कथानक आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Web series on marathi drama purush written by jayant dalvi scj
First published on: 24-05-2024 at 19:34 IST