Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video: मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्या ती इन्स्टाग्रामवर केलेल्या एका कमेंटमुळे चर्चेत आली आहे. आपल्या चाहत्याच्या एका पोस्टवर तिने कमेंट टाकली आणि त्यानंतर या चाहत्याला ट्रोल करण्यात आले. अखेर त्या चाहत्याची दया येऊन मृणाल ठाकूरने आपली कमेंट डिलिट केली आहे. तसेच एक व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यामुळे आपले मन दुखावले असल्याचे म्हटले आहे. अर्थाच तिची ही टिप्पणी उपरोधिक असून तिने सदर चाहत्याचे कौतुकही केले आहे.

नेमका प्रकार काय घडला?

इन्स्टाग्रामवर एका चाहत्याने दिवाळीनिमित्त मृणाल ठाकूरच्या व्हिडीओला एडिट करत स्वतःला मृणाल ठाकूरबरोबर असल्याचे दाखविले होते. हा व्हिडीओ मृणाल ठाकूरच्या नजरेत आल्यानंतर तिने सदर चाहत्याचे अकाऊंट तपासले तर तिथे अशाच प्रकारचे एडिटेड व्हिडीओ असल्याचे तिच्या लक्षात आले. यानंतर मृणाल ठाकूरने तिच्या व्हिडीओखाली कमेंट करून चाहत्याला सुनावले.

mrunal thakur commnt
मृणाल ठाकूरने डिलिट केलेली कमेंट

“भावा, स्वतःला का खोटा दिलासा देत आहेस? तू हे जे काही करतोय, ते कूल आहे असे तुला वाटते का? तर अजिबात नाही!”, अशी कमेंट मृणाल ठाकूरने सदर व्हिडीओखाली केली. सोशल मीडियावर तिच्या कमेंटची चांगलीच चर्चा झाली. तसेच इतरांनी सदर मुलाला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. ही बाब मृणालच्या लक्षात आल्यानंतर तिने आपलीच कमेंट डिलिट केली आणि त्यानंतर इन्स्टा स्टोरीला एक व्हिडीओ पोस्ट करत सदर चाहत्याचे कौतुक केले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझं मन दुखावलं – मृणाल

मृणाल ठाकूरने केलेल्या व्हिडीओत ती उपरोधिकपणे बोलत असल्याचे दिसते. तसेच हा विषय हसण्यावारी नेऊन तिने सदर चाहत्याला ट्रोल करू नका, असेही आवाहन केले. ती म्हणाली, “जेव्हा मला चाहत्याचा व्हिडीओ दिसला तेव्हा आनंद झाला. कुणाबरोबर नाही तर याच्याबरोबर तरी मी दिवाळी साजरी करत आहे, याचा आनंद वाटला. पण मग मी त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले. तर त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ असल्याचे दिसून आले. हे पाहून माझे मन तुटले. मला दुःख वाटलं. पण मला त्याचे व्हिडीओ एडिटिंगचे कौशल्य आवडले. त्याने आपली कला चांगल्या कामासाठी वापरली पाहीजे. तर आता मी सर्वांना विनंती करते की, त्या चाहत्याला ट्रोल करू नका. त्याचा उद्देश चुकीचा नसेल आणि अपेक्षा करते की, त्याने आणखी कुणाचे हृदय तोडू नये.”