अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांचा प्री -वेडिंग सोहळा जामनगरमध्ये दिमाखात चालू आहे. शुक्रवारी (१ मार्च रोजी) या सोहळ्याला सुरुवात झाली असून ३ मार्चला या सोहळ्याची सांगता होईल. तिन्ही दिवस या जंगी सोहळ्यात विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत. पहिल्याच दिवशी रिहानाने पाहुण्यांचं मनोरंजन केलं. यावेळी धाकट्या मुलाच्या लग्नात नीता व मुकेश अंबानी यांनीही रोमँटिक डान्स केला.

अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात अनेक कलाकार परफॉर्म करणार आहेत. राधिका व अनंतही डान्स करणार आहेत. याचदरम्यान, होणाऱ्या नवरदेवाचे आई-वडील म्हणजेच नीता अंबानी व मुकेश अंबानी यांनी रोमँटिक गाण्यावर डान्स केला. त्यांच्या डान्सचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ या आयकॉनिक गाण्यावर दोघांनी डान्स केला.

Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
vasai liquor party on boat marathi news, roro boat liquor party marathi news
वसई-भाईंदर रोरो सेवेच्या बोटीत मद्य पार्टी, समाजमाध्यमांवर चित्रफित प्रसारित
Why is cholesterol rising among the young
High Cholesterol : तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण का वाढत आहे? तज्ज्ञांनी सांगितले कारण
siddhu moosewala house video goes viral after his brother birth
वयाच्या ५८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म; घरातील जल्लोषाचा VIDEO व्हायरल

अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये रिहानाचा जबरदस्त परफॉर्मन्स; मंचावर थिरकले अंबानी कुटुंबीय, तर गायिका भारताबद्दल म्हणाली…

इशा अंबानी पिरामल नावाच्या फॅनपेजवरून नीता व मुकेश अंबानी यांच्या डान्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मोठ्या स्क्रीनवर हे दोघेही डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म

दरम्यान, अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जगभरातील निमंत्रित पाहुणे जामनगरमध्ये दाखल झाले आहेत. शाहरुख खान व त्याचे कुटुंब, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अर्जुन कपूर, रितेश देशमुख-जिनिलीया देशमुख, करीना व सैफ यांच्यासह अमृता फडणवीस व उद्धव ठाकरेंचे कुटुंबही या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये आहेत.