scorecardresearch

Video: भारताचा पहिला सुपरहिरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय; चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

चित्रपटाचा टीझर मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

Video: भारताचा पहिला सुपरहिरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय; चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

नव्वदच्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान.’ त्यावेळी शक्तिमान या पहिल्या इंडियन सुपरहिरोने अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर जादू केली होती. आता हाच सुपरहिरो चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘शक्तिमान’ हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शक्तिमान चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझर व्हिडीओच्या सुरुवातीला ते बोलताना दिसत आहेत की, ‘मी तुम्हाला सांगायला उशिर केला आम्ही शक्तिमान चित्रपट करत आहोत. मी तुम्हाला जे वचन दिले होते ते आज पूर्ण करत आहे. शक्तिमान चित्रपटाची घोषणा केली आहे.’
आणखी वाचा : ‘आता माझ्या बेडरुममध्ये…’, मध्यरात्री मन्नतवर गेलेल्या कपिल शर्मावर शाहरुख संतापला?

मुकेश खन्ना यांनी प्रदर्शित केलेल्या टीझरमध्ये शक्तिमानची झलक पाहायला मिळते. शक्तिमानचे सुरक्षा कवच, गंगाधरचा चष्मा आणि बॅकग्राऊंडला म्यूझिक ऐकू येत आहे. दरम्यान शहरातील अनेक बिल्डींग आणि त्यांच्यावर एक काळी सावली पडताना दिसत आहे.

शक्तिमान ही मालिका ९०च्या दशकात सुपरहिट ठरली होती. ही मालिका त्यावेळी अतिशय लोकप्रिय ठरली होती. मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले होते. मुकेश खन्ना यांना शक्तिमान या सुपरहिरोन ओळख मिळवून दिली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-02-2022 at 10:12 IST

संबंधित बातम्या