प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी अफजल खानाची भूमिका कोण साकरणार याचा खुलासा करण्यात आला आहे.

महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा याची छोटीशी झलक ‘शेर शिवराज’च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात सादर करण्यात आली. या चित्रपटात अफजलखानाची भूमिका कोण साकारणार, याची उत्सुकता गेले अनेक दिवस साऱ्यांनाच लागली होती. अखेर त्याचा उलगडा झाला असून ही भूमिका बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मुकेश ऋषी (Mukesh Rishi) साकारणार आहेत.

madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

आणखी वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला शरद पवार यांचा ‘सिल्व्हर ओक’ बंगला आतून कसा दिसतो, पाहा फोटो

आणखी वाचा :मी तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पाया पडलो आणि तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीने दिलं उत्तर

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर उभी राहणारी ही व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मला मिळालं याचा मला आनंद आहे. विशेष म्हणजे ज्याच्या ध्यासात छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशा कल्पक आणि अभ्यासू दिग्दर्शकासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दराऱ्यामुळेच भारताकडे वाकडया नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही,” असे मुकेश म्हणाले.

आणखी वाचा : “तू तर रोजा पाळत नाही किमान मुलांना तरी…”, रमजानच्या महिन्यात हॉटेलमध्ये गेल्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल

किल्ले प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडले होते. ‘गनिमीकाव्याने खेळले गेलेले हे युध्द आणि मिळवलेला प्रचंड विजय महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरला जाऊ शकत नाही. शिवचरित्रातील ही यशस्वी गाथा ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने २२ एप्रिलला मोठया पडदयावर येणार आहे.

आणखी वाचा : अनुष्का शर्मा मराठमोळ्या जेवणाच्या प्रेमात, फोटो शेअर करत म्हणाली…

‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज तर बलाढ्य अफज़लखानाच्या रुपात मुकेश ऋषी त्यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, वैभव मांगले, सुश्रुत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर,ईशा केसकर, रिशी सक्सेना, अशी कलाकारांची तगडी फौज पहायला मिळणार आहे.