बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डवर आधारित अनेक चित्रपटांची आतापर्यंत निर्मिती झाली आहे. बॉलिवूडने अंडरवर्ल्डमध्ये वापरले जाणारे बरेचशे शब्द सामान्य जनतेपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पोहचविले आहेत. यामध्ये भाई, खोका म्हणजे एक कोटी, पेटी म्हणजे एक लाख रुपये तसेच हत्येसंदर्भात निगडित सुपारी यासारख्या शब्दांचा समावेश होतो. बॉलिवूडने अंडरवर्ल्डमध्ये वापरात येणारे शब्द तुम्हाला परिचित आहेत. पण कदाचित अंडरवर्ल्डमध्ये बॉलिवूड कलाकारांना कोणत्या टोपण नावाने अर्थाच सांकेतिक नावांनी ओळखले जाते याची तुम्हाला माहिती नसेल. मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डमधील दुरध्वनी संभाषण रेकॉर्डीग करण्यात यश मिळविले आहे. यातून पोलिसांना अंडरवर्ल्डमध्ये बॉलिवूड कलाकारांना दिलेल्या सांकेतिक नावांची माहिती प्राप्त झाली आहे. मुंबई पोलिसांना या संभाषणादरम्यान  तब्बल ९ आघाडीच्या बॉलिवूड कलाकारांना अंडरवर्ल्डमध्ये कोणत्या सांकेतिक नावाने ओळखले जाते याचा खुलासा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामध्ये बॉलिवूड दबंग सलमान खान पासून रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट पासून देसी गर्ल प्रियांकाच्या सांकेतिक नावांचा खुलासा झाला आहे. मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील दबंग सलमान खान विषयी चर्चा करताना अंडरवर्ल्डमधील लोक ‘किंगपिन’ किंवा ‘ड्रग्ज माफिया’ या नावाचा वापर करतात. तर ‘बेफिक्रे’ या चित्रपटातून वाणी कपूरसोबत झळकलेल्या रणवीर सिंहला ‘पैडलर’ या नावाने संबोधले जाते. आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर याला देखील अंडरवर्ल्डमध्ये लोकप्रियता आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून लोकप्रियतेचे प्रमाणपत्र मिळालेल्या रणबीर कपूरचाेअंडरवर्ल्डमध्ये ‘होस्ट’ म्हणून नामकरण करण्यात आले आहे.

बॉलिवूड कलाकारांच्या सांकेतिक भाषेतील नामकरणामध्ये अभिनेत्री देखील समावेश आहे. अभिनेत्रींची सांकेतिक नावे ठरविताना अंमली पदार्थाच्या नावांचा वापर केल्याचे दिसून येते. यामध्ये ‘ उडता पंजाब’ या चित्रपटात नशेमध्ये धुंद दिसणाऱ्या आलिया भट्टला ‘कोकीन’अशा नावाने ओळखले जाते. तर बॉलिवूड क्विन कंगनाचे ‘अफिम’ असे नामकरण केल्याचे दिसते. बॉलिवूड ब्यूटी कतरिनाची देखील अंडरवर्ल्डमध्ये चांगलीच चलती दिसते. ‘चिकनी चमेली’ या गाण्यामध्ये अंडरवर्ल्डच्या व्यासपीठावर ठुमके लगावण्याचा अभिनय साकारणारी कतरिना ‘स्मॅक’ या नावाने अंडरवर्ल्डमध्ये परिचित असल्याचे दिसते. बॉलिवूडनंतर सातासमुद्रापलिकडे हॉलिवूडमध्ये छाप पाडणारी देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या नावाचा देखील यामध्ये समावेश आहे. प्रियांकाच्या नावाची चर्चा करताना अंडरवर्ल्डमधील मंडळी ‘एलएसडी’ या सांकेतिक नावाचा वापर करतात. तर अनुष्का शर्माला ‘हशीश’ या नावाने संबोधले जाते. अंडरवर्ल्डच्या यादीत नरगिस फाकरीचा देखील समावेश आहे. तिला अंडरवर्ल्डमध्ये ‘इकॅस्टी’ या अंमली पदार्थाच्या नावाने ओळखले जाते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police cracked the bollywood underworld code names
First published on: 02-01-2017 at 21:02 IST