स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या गाजलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाचा सिक्वेल येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या सिक्वेलचा ‘ट्रेलर’ तयार करण्यात आला आहे. चित्रपटात स्वप्निल आणि मुक्ता हेच दोघे प्रमुख भूमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे.
चित्रपटाच्या निमित्ताने मिराह एन्टरटेन्मेंट व एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट एकत्र आले आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा गाजलेला मूळ चित्रपट सहा भाषांमध्ये तयार करण्यात आला होता. चित्रपटाची झलक नुकतीच मुंबईत दादर येथे एका विशेष कार्यक्रमात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आली. या वेळी स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे, सतीश राजवाडे यांच्यासह मिराह एन्टरटेन्मेंटचे अमित भानुशाली, एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
१२ नोव्हेंबर २०१५ रोजी ‘मुंबई पुणे मुंबई’-२ हा चित्रपट संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2015 रोजी प्रकाशित
‘लग्नाला यायचं हं’
स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या गाजलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाचा सिक्वेल येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

First published on: 02-08-2015 at 03:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune mumbai return part