Lock Upp Grand Finale : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या लॉक अप या रिअॅलिटी शोची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरु आहे. नुकतंच बहुचर्चित लॉकअपच्या पहिल्या पर्वाच्या विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले आहे. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा या शो चा विजेता ठरला. मुनव्वर फारुकीला सर्वाधिक मते मिळाल्याने तो या शो चा विजेता ठरला.
‘लॉक अप’ या शोचा विजेता ठरलेल्या मुनव्वर फारुकीला ट्रॉफी, २० लाख रुपये आणि एक अलिशान कार भेट म्हणून देण्यात आली. त्यासोबतच त्याला परदेशात फिरायला जाण्याची संधीही मिळणार आहे. या शोचा विजेता ठरल्यानंतर मुनव्वरने आपल्या चाहत्यांचे आभार व्यक्त केले. “गेल्या दोन रात्रीपासून मी अजिबात झोपलेलो नाही. मला ग्रँड फिनालेची फार जास्त भीती वाटत होती. मी फार घाबरलो होतो”, असे त्याने यावेळी म्हटले.
“…ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट”, पतीने ‘चंद्रमुखी’बद्दल केलेल्या पोस्टवर अमृता खानविलकरची खास कमेंट
दरम्यान ‘लॉकअप’ हा बहुचर्चित शो गेल्या २७ फेब्रुवारीला सुरु झाला. या शो मध्ये २० स्पर्धक सहभागी झाले होते. यात शिवम शर्मा, पायल रोहतगी, आझम फलाह, मुनव्वर फारुकी, अंजली अरोरा आणि प्रिन्स नरुला यासारख्या अनेक कलाकारांच्या नावाचा समावेश होता. ‘लॉक अप’ शो च्या टॉप ३ स्पर्धकांमध्ये अंजली अरोरा, पायल रोहतगी आणि मुनव्वर फारुकीचा समावेश होता.
“मराठी प्रेक्षक गेले कुठे?”, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अखेर सर्वाधिक मते मिळाल्यानंतर मुनव्वर फारुकीला या शोचा विजेता घोषित करण्यात आले. तर पायल रोहतगी ही या शोची फर्स्ट रनरअप ठरली. दरम्यान कंगना रणौत होस्ट करत असलेल्या हा शो सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला होता. कंगनाच्या या बहुचर्चित लॉक अप शो ला ५०० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.