प्रसिद्धीच्या तुलनेत कमाई काहीच नाही, रणवीरच्या वडिलांची तक्रार

माझी जितकी प्रसिद्धी आहे त्या तुलनेत मी फार कमी पैसे कमावतो, अशी तक्रार वडील सारखे करत असतात असं रणवीर म्हणाला.

‘पद्मावत’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जाणार आहे.

बॉलिवूडमधला सर्वात प्रसिद्ध कलाकार रणवीर सिंग हा यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘बँड बाजा बारात’ पासून ते ‘पद्मावत’ सिनेमापर्यंत रणवीरनं साकारलेल्या भूमिकांच अगदी महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील कौतुक केलंय. पण रणवीरचे वडील मात्र त्याच्या आर्थिक कमाईबाबत काहीसे नाराज असल्याचं त्यानं मस्करीत म्हटलं आहे.

‘माझी जितकी प्रसिद्धी आहे त्या तुलनेत मी फार कमी पैसे कमावतो, अशी तक्रार वडील सारखे करत असतात’ असं रणवीर म्हणाला. नुकतीच रणवीरनं एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती, त्यावेळी तो म्हणाला. पण त्याचबरोबर कलाकार म्हणून खूप पैसे कमावण्यापेक्षा हिंदी सिनेमानं खूप पैसे कमावावेत असं मतही त्यांनं यावेळी व्यक्त केलं.

वाचा : आर. माधवनच्या मुलाने देशासाठी स्विमिंगमध्ये पटकावले पदक

अनेक भारतीय सिनेमानं पाचशे कोटींहूनही अधिकचा गल्ला जमवला आहे. एक कलाकार म्हणून मला याचा आनंद आहे. पैसे कमावण्यापेक्षा अभिनयाच्या माध्यमातून जगाच्या रंगमंचावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याला प्राधान्य देण्यास मला आवडेल असंही तो यावेळी म्हणाला. नुकताच रणवीरला रणवीर सिंगला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ घोषीत झाला आहे. ‘पद्मावत’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जाणार आहे.

Photos: सौंदर्य कसे असावे तर ऐश्वर्या राय बच्चनसारखे असावे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: My father keeps complaining that i make less money than my popularity said ranveer singh

ताज्या बातम्या