खरंतर नावात बरंच काही आहे ! ‘पिंडदान – A Mystical love story…..’ ह्या आगामी मराठी चित्रपटाचं नाव अर्धं इंग्लिश आणि अर्धं मराठी आहे. ह्या चित्रपटाच्या नावावरून चित्रपटाच्या गोष्टीचा काही अंदाज बांधता येतोय ? खरं तर ह्या गोष्टीत सगळं काही आहे – जादू आहे, गूढ आहे, अव्यक्त ओढ आहे, प्रेम तर आहेच आहे पण त्या प्रेमातून येणारं – अनादी अनंत काळाचा संबंध देखिल आहे. शिवाय याचा पिंडदानाशी कसा काय संबंद असेल ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील १७ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘ पिंडदान –A Mystical Love Story !’ ह्या ‘सारथी एन्टरटेनमेंटच्या’, पूनम शेंडे ह्यांची प्रस्तुती असलेल्या आगामी चित्रपटात!
शिवाय फॅशन इंडस्ट्रीतलं मोठं नाव असलेले बंटी प्रशांत या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. प्रशांत पाटील ह्यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन आणि बंटी देशपांडे ह्यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे . चित्रपटाचं लेखन अग्निपथचे सह-संवाद लेखक अविनाश घोडके यांनी केलं आहे. वैभव जोशी आणि मंदार चोळकर ह्यांनी गीतलेखन तर सागर धोटे हे ह्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत आणि दिपाली देशपांडे ह्यांनी ह्या चित्रपटासाठी कपडे डिझाइन केले आहेत.
खऱ्या प्रेमाला कोणतही बंधन नसतं …….ना भाषेचं, ना देशाचं, ना जातीचं, ना धर्माचं. जेव्हा ह्या सगळ्या सीमा पार करून, दोन जीव एकमेकांच्या प्रेमाचा, एकमेकांचा स्विकार करतात तेंव्हा त्यांनी एकमेकांचे रितीरिवाज, भाषा, धर्म ह्यांचाही मनोमन स्विकार केलेला असतो. मग भलेही धर्मांतराचा सोपस्कार झालेला नसला तरीही ! अश्याच एका सातासमुद्रापार भेटलेल्या आणि प्रेमात पडलेल्या दोन जीवांची गोष्ट म्हणजे, ‘उदय पिक्चर्स’ च्या अश्तिका इरा एलएलपी निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘पिंडदान – A Mystical Love Story !’ पण सगळ्या सीमा पार करून घडलेली प्रेम कथा आणि पिंडदान ह्या दोन गोष्टीचा काय संबंध असू शकेल ? ह्या चित्रपटाच्या नावावरूनच प्रेक्षकांमध्ये आणि एकंदरच सिनेसृष्टी मध्ये खूप उत्सुकता वाढलीये.
खऱ्या शास्त्राप्रमाणे पिंडदान कोणीही करू शकतं, फक्त ती पिंडदान करणारी व्यक्ती, ही मृत व्यक्तीशी मनाने जोडलेली असावी ! त्यांच्यात नातं कोणतही असू देत पण त्यांच्यातील प्रेम निस्वार्थी असावं. अश्या निस्वार्थी भावनेनं केलेलं पिंडदान लागू होतं. ह्यातील दानाने दातृत्त्व मोठं होतं ! ह्या उदात्त विचाराने प्रेरित झालेला हा चित्रपट, पिंडदान हा विधी – मानणाऱ्या आणि न मानणाऱ्यांना देखील मनोमन भावतो आणि हेच ह्या चित्रपटाचं खरं यश आहे. त्यामुळे नावात काय आहे ? ……असं म्हणण्यापेक्षा ह्या चित्रपटाच्या नावातच सारं काही आहे ! इतक्या कल्पक नावाचा कल्पक चित्रपट नक्कीच पहायला पाहिजे !
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2016 रोजी प्रकाशित
‘पिंडदान’….नावात काय आहे ?
पिंडदान करणारी व्यक्ती, ही मृत व्यक्तीशी मनाने जोडलेली असावी.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 21-05-2016 at 10:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mystery behind pindadan name