गोव्यात झालेल्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चा निरोप समारंभ चांगलाच गाजला. कारण या समारंभात बोलताना मुख्य ज्युरी आणि इस्त्रायली चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर टीका केली. हा चित्रपट ‘व्हल्गर’ ( अश्लिल ) आणि ‘प्रोपगंडा’ ( प्रचारकी ) असल्याचं मत नदव लॅपिड यांनी मांडलं होतं.

नदव लॅपिड यांच्या या विधानानंतर बराच वादंग निर्माण झाला होता. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील अभिनेत्यांनीही नदव लॅपिड यांना लक्ष्य केलं आहे. तसेच, भारतातूनही नदव लॅपिड यांच्यावर टीका करण्यात येत होती. तर, इस्त्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील राजदूत कोब्बी शोशानी यांनी देखील लॅपिड यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हणत वादातून काढता पाय घेतला होता. त्यानंतर आता नदव लॅपिड यांनी वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं म्हणत माफी मागितली आहे.

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
sanjay nirupam allegations on sanjay raut,
“संजय राऊतच खिचडी चोर, त्यांनी १ कोटी रुपयांची…”; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “ज्या कंपनीला…”
aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

हेही वाचा : ‘काश्मीर फाइल्स’वरील वक्तव्यानंतर नदाव लॅपिडच्या विकिपीडिया पेजवर आक्षेपार्ह बदल, लिहिलं “डाव्या विचारसरणीचे…”

सीएनएन न्यूज १८ शी बोलताना नदव लॅपिड यांनी म्हटलं, “द काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझा उद्देश काश्मिरी पंडित समुदाय अथवा त्यांना झालेल्या त्रासाचा अपमान करणे नव्हता. त्यामुळे मी माफी मागतो,” असे लॅपिड नदव म्हणाले.

“पण मी चित्रपटाबद्दल जे मतं माडलं आहे, ते स्पष्टपणे सांगितलं होतं. कारण, माझ्यासाठी आणि अन्य सहकारी ज्युरी सदस्यांसाठी तो एक असभ्य प्रचार करणारा चित्रपट वाटला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंचासाठी तो चित्रपट अयोग्य आहे. हे मी पुन्हा सांगू इच्छितो,” असेही नदव लॅपिड यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “मी लहानपणापासूनच…” ‘बिग बॉस’मधील ‘गोल्डमॅन’ने साडेचार कोटींचे दागिने घालण्यामागचे सांगितले कारण

काय म्हणाले होते नदव लॅपिड?

‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त बोलताना इस्त्रायली चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर भाष्य केलं होतं. ते म्हणाले, “द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित झालो आहोत. हा चित्रपट म्हणजे त्रस्त करणार अनुभव आहे. हा चित्रपट आम्हाला ‘व्हल्गर’ (अश्लील) आणि ‘प्रोपगंडा’ ( प्रचारकी ) वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेचं आहे,” असं लॅपिड यांनी सांगितलं होतं.