‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या पर्वात चार सदस्यांनी वाइल्ड कार्डमधून एन्ट्री घेतली. पुण्याचे ‘गोल्डन बॉइज’ म्हणून लोकप्रिय असलेले सनी नानासाहेब वाघचौरे आणि संजय गुजर यांनी बिग बॉस १६ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. हे दोन्ही स्पर्धक मराठमोळे आहेत. बिग बॉस हिंदीच्या घरात थेट पुण्यातील मराठमोळ्या सदस्यांनी एन्ट्री केल्यानंतर त्यांची सातत्याने चर्चा होत आहे. हे दोन्ही सदस्य सध्या परिधान केलेल्या सोन्यामुळे चर्चेत आहेत.

बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या सनी वाघचौरेला अंगावर सोनं घालायची प्रचंड आवड आहे. त्याच्या गळयात सोन्याच्या चैनी असतात. हातात गोल्डचे कडे, ब्रेसलेट आणि सोन्याचे घडयाळ असते. तो फक्त अंगावर सोनं घालत नाही तर त्याचे बूट आणि मोबाईलही सोन्याचा आहे. त्याने त्याच्या कारलाही सोन्याचा मुलामा दिला आहे. त्यामुळे तो चर्चेत आहे. मात्र नुकतंच त्याने त्याला सोन्याची इतकी आवड का आहे? याबद्दलचा खुलासा केला आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दलचे खरे कारण सांगितले.
आणखी वाचा : “जबरदस्ती गर्भपात, शारीरिक छळ आणि पट्ट्याने मारहाण…” ‘बिग बॉस’मधल्या ‘गोल्डमॅन’ विरोधात पत्नीने केलेले गंभीर आरोप

rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
complainant get back rs 3 5 lakh duped by online fraud with the help of kashimira police
वसई: ऑनलाईन फसवणुकीतील सव्वा तीन लाख रुपये मिळवून दिले, काशिमिरा पोलिसांनी तत्पर कारवाई
aarzoo khurana advocate and wildlife photographer documents Indias 55 tiger reserves
वकिली सोडली अन् धरली अनोखी वाट; वाइल्डलाइफ फोटोग्राफीत रमलेल्या आरजू खुरानाची गोष्ट

सनी वाघचौरे नेमकं काय म्हणाला?

“मला लोक अनेकदा प्रश्न विचारतात की मी इतकं सोनं कसं काय घालू शकतो. त्यावर मी त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्ही अनेक दिवसांपासून एखादे काम करत असाल तर तुम्हाला त्या गोष्टींची सवय होते. उदा. एखादी व्यक्ती जीममध्ये व्यायाम करत असेल आणि तो १०० किलो वजन उचलत असेल, तर त्याला पाहून नवीन लोक थक्क होतात. हा इतके किलो वजन कसे उचलतो, असा प्रश्न त्यांना पडतो. मग तोच व्यक्ती हळहळू सराव करतो आणि तो स्वत:ही १०० किलो वजन उचलायला लागतो. हे सर्व सांगण्याचे तात्पर्य हेच की मी लहानपणापासून सोनं परिधान करतोय. मी फक्त कालांतराने सोन्याच्या दागिन्यांच्या संख्येत आणि वजनात वाढ करत गेलो.

आता मी जवळपास सात ते आठ किलो सोनं परिधान करतो. तर बंटी (संजय गुजर) हा चार ते पाच किलो सोनं अंगावर घालतो. आम्ही हे इतके वजन सहज पेलवू शकतो. हे इतकं सोनं घालण्यात आम्हाला कोणतीही अडचण वाटत नाही”, असे तो म्हणाला.

आणखी वाचा : “मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान सध्या मुंबईत सोन्याचा भाव हा ५४ हजार ७६० रुपये इतका आहे. यानुसार जर सनीच्या ८ किलो दागिन्यांची किंमत काढली तर ती साधारण साडेचार ते पाच कोटींच्या घरात जाते. तर बंटी हा ५ किलो सोने परिधान करत असेल तर त्याची किंमत अडीच ते तीन कोटी इतकी आहे.

दरम्यान आता गोल्ड प्लेटेड कार व मोबाइल तसंच अंगावर किलोभर सोनं घालून फिरणारा अशी सनीची ओळख आहे. तो चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना ओळखतो. यापूर्वी अनेक टीव्ही शो मध्ये तो दिसला होता. सध्या तो बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. यामुळे तो चर्चेत आहे.