दाक्षिणात्य कलाकार कायमच चर्चेत असतात. आपल्या लूकमुळे स्टाईलमुळे ते ओळखले जातात. सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतलं एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे नागा शौर्या, चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असताना तो बेशुद्ध पडला होता. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर त्याची प्रकृती सुधारली. आज नुकताच त्याचा विवाह सोहळा पार पडला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हा विवाह सोहळा पारंपरिकरित्या पार पडला. दोघांनी दाक्षिणात्य पद्धतीचे कपडे परिधान केले होते. मित्रमंडळी नातेवाईक यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. मेहंदी, लग्न आणि कॉकटेल पार्टी अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. बंगळुरू येथील एका हॉटेलात हा सोहळा पार पडला आहे. एका चाहत्याने लग्नाचे आमंत्रण व्हिडीओ शेअर केले ज्यात हळदी विधींसह लग्नाच्या जल्लोषाची संपूर्ण माहिती होती.

नागाची पत्नी अनुषा शेट्टी, जी बंगळूरुस्थित इंटिरिअर डिझायनर आहे. जिची स्वतःची कंपनी आहे. तिच्या कंपनीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लग्नाआधी ते दोघे एकमेकांना डेट करत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागाचा जन्म इलरूचा असून त्याने अभिनयात करियर करण्यासाठी हैदराबाद गाठले. त्याने तेलगू चित्रपट सृष्टीत ५ वर्ष संघर्ष केला आहे. त्यानंतर त्याला पहिला चित्रपट २०११ साली मिळाला. त्याने अनेक जाहिरातींमध्येदेखील काम केलं आहे.