साउथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. नागा चैतन्यचा ‘लव्हस्टोरी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खान नुकताच हैदराबादमध्ये पोहचला होता. सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटनंतर नागार्जुन आणि त्यांच्या कुटुंबियांनी आमिर खानसाठी डिनरचं आयोजन केलं होतं. यावेळी आमिर खानच्या समोरच नागार्जुन भावूक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. नागार्जुन याचं भावूक होण्यामागे एक खास कारण होतं.

नागा चैतन्य आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमातही झळकणार आहे. बॉलिवूडमधील हा त्याचा पहिला सिनेमा आहे. डिनरदरम्यान या सिनेमाबद्दल चर्चा सुरु असताना सिनेमातील नागा चैतन्यच्या भूमिकेबद्दल तसचं त्याच्या नावाबद्दल चर्चा करण्यात आली. या सिनेमात नागा चैतन्यच्या भूमिकेचं नाव ‘बाला राजू’ असं आहे. योगायोगाने नागा चैतन्याचे आजोबा आणि नागार्जुन यांचे वडील अक्क‍िनेनी नागेश्वर राव यांनी त्यांच्या पहिल्या सिनेमात साकारलेल्या भूमिकेचं नावदेखील ‘बाला राजू’ हेच होतं. हा योगायोग ऐकून नागार्जुन थक्क झाले आणि वडिलांच्या आठवणीत भावूक झाले.

गाडीभोवती गराडा घालणाऱ्या गरीब मुलांचं जॅकलिनने ‘असं’ जिंकलं मन; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


२०१४ सालामध्ये नागार्जुन यांच्या वडिलांचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं. १९४० साली अक्क‍िनेनी नागेश्वर राव यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. २०१३ सालापर्यंत ते अभिनय क्षेत्रात सक्रिय होते. अक्क‍िनेनी नागेश्वर राव यांनी मुलगा नागार्जुन आणि नातू नागा चैतन्य यांच्यासोबतही स्क्रीन शेअर केली आहे.

दरम्यान नागा चैतन्यची ‘लाल सिंह चड्ढा’ ही बॉलिवूडमधील डेब्यू फिल्म असून हा सिनेमा यंदाच्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलिज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.