बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिचा आज वाढदिवस आहे. नम्रता आज तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. २२ जानेवारी १९७२ रोजी एका मराठी कुटुंबात नम्रताचा जन्म झाला. १९९३ मध्ये मिस इंडियाचा ताज जिंकून नम्रता पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली होती. मिस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धत ती सहाव्या स्थानावर होती. त्यानंतर काही वर्षांनी तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. काही वर्षांनी दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता महेश बाबूबरोबर लग्न केल्यानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम केला. पण ती कायमच चर्चेत असते.

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर हे जोडपे सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. नम्रता शिरोडकर सध्या सिनेसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
आणखी वाचा : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्यात दीपिका पदुकोणचा शाही थाट, साडीची किंमत माहीत आहे का?

काही वर्षांपूर्वी नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ask me anything द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला होता. यावेळी तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. तिची प्रोफेशनल लाईफ आणि महेश बाबू यांच्याबद्दलचे अनेक प्रश्न यात होते. याची तिने फार चांगल्या पद्धतीने उत्तर दिली.

यादरम्यान एका चाहत्याने नम्रताला ‘महेशबाबू मराठीमध्ये बोलू शकतात का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर तिने मजेशीर उत्तर दिले. या उत्तराबरोबरच तिने तिच्या मनातील इच्छाही बोलून दाखवली. या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, “माझीसुद्धा फार इच्छा आहे. पण माझ्या दोन्हीही मुलांना मराठी येते. त्याबरोबरच त्यांना इंग्रजी आणि तेलुगू भाषाही बोलता येते.”

आणखी वाचा : न्यूड फोटोशूट ते बोल्ड भूमिका, राखी सावंतच्या अटकेमुळे चर्चेत आलेली शर्लिन चोप्रा कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर महेश-नम्रताने १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली. मात्र महेश बाबू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाला. महेश आणि नम्रताला दोन मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नाव आहेत.