यंदाचा झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. हिंदीच्या या लखलखत्या सोहळ्यामध्ये एरव्ही प्रादेशिक चित्रपटांना जागा नसते. मात्र यंदा ‘झी सिने अॅवॉर्ड्स’ने आपले स्वरुप बदलले असून या सोहळ्यात प्रादेशिक चित्रपटांचीही दखल घेतली. यंदाच्या या ‘झी सिने अॅवॉर्ड्स’ सोहळ्यात मराठमोळ्या कलाकारांनीही आपला ठसा उमटवला.
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेता नाना पाटेकर यांना ‘नटसम्राट’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर अभिनेत्री अमृता सुभाषला ‘किल्ला’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला.
हिंदीमध्ये सलमान खानला (बजरंगी भाईजान) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर दीपिका पदुकोणला (बाजीराव मस्तानी) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘बजरंगी भाईजान’ हा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2016 रोजी प्रकाशित
‘झी सिने अॅवॉर्ड्स’वर नाना पाटेकर आणि अमृता सुभाषची मोहोर
या सोहळ्यात पहिल्यांदाच प्रादेशिक चित्रपटांचीही दखल घेतली गेली.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 07-03-2016 at 16:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar and amruta subhash won zee cine award